RCB Vs LSG: Sanjeev Goenka finally happy! He wrote one word 'that' for Rishabh Pant's century, read in detail..
RCB Vs LSG : आयपीएल 2025 च्या स्टेज लीगचा शेवटचा सामना काल एकाना स्टेडियमवर खेळवण्यात आला. या ७० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने ६ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्माने तुफानी खेळीच्या जोरावर १९ व्या षटकातच विजय मिळवला. या सामन्यात संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतचे त्याच्या शतकी खेळीसाठी कौतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या संघ लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यादरम्यान, पंतच्या कामगिरीचे एका शब्दात कौतुक केले आहे.
हेही वाचा : IND Vs END : Shreyas Iyer सोबत जे घडले ते चुकीचेच! माजी खेळाडूच्या खुलाशाने खळबळ..
एलएसजीने आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला आहे. या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर एलएसजीने २२७ धावांचा डोंगर उभा केला. तरी देखील आरसीबीकडून ६ विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे ऋषभ पंतचे तडाखेबाज शतक. एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतने ६१ चेंडूचा सामना करत ११८ धावा केल्या. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ८ षटकार लगावले. पंतच्या या खेळीनंतर एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी पंतला २७ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले. इतक्या मोठ्या रकमेसह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२५ मध्ये त्याच्यावरील अपेक्षांचे ओजहयात वाढ झाली. तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. पहिल्या १२ डावांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. या १२ सामन्यात त्याने १०२ पेक्षा कमी स्ट्राईक रेटने फक्त १४८ धावाच केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. पण १३ व्या सामन्यात खरा ऋषभ पंत दिसून आला. तसेच २७ मे रोजी आयपीएल २०२५ मध्ये खेळलेल्या त्याच्या १४ सामन्यात त्याने आपल्या बॅटने कमाल केली. पंतने आरसीबीविरुद्ध ११८ धावांची खेळी करून सर्वांना सुखद धक्का दिला.
‘Pant’astic! 👏🏻 #LSGvsRCB pic.twitter.com/d83M19sKP8
— Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) May 27, 2025
हेही वाचा : IPL 2025 : क्रिकेट जगतात Vaibhav Suryavanshi चा डंका! ५८ फलंदाजांना पिछाडीवर टाकून पटकावले पहिले स्थान..
ऋषभ पंतचा हा जुना अवतार पाहून संजीव गोयंका खूप झाल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या एक्स हँडलवर त्याच्यासाठी एक शब्द लिहिला – ‘पँटास्टिक!’ ऋषभ पंतच्या खेळीने संजीव गोयंका यांनी त्याचे एका शब्दांत वर्णन केले.