श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs END : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे स्टेज सामने संपले आहेत. आता २९ मे पासून प्लेऑफ सामने सुरू होतील. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने आधीच टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे. आता क्वालिफायर-१ सामन्यात आरसीबीचा सामना पंजाब किंग्जशी होणार असून दुसरीकडे, एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल.
मागील हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपडावर नाव कोरले होते. अशा परिस्थितीत, अनेक लोकांना असे वाटत आहे की, श्रेयसकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तो नेहमीच संघात अंत किंवा बाहेर असतो. माजी फलंदाज रॉबिन उथप्पाकडून याबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : IPL 2025 : IPL च्या अंतिम सामन्यासाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना आमंत्रण! BCCI ने घेतला निर्णय..
जिओ हॉटस्टारशी बोलत असताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, “या हंगामात पंजाब किंग्जच्या उत्तम कामगिरीचे संपूर्ण श्रेय हे अय्यरला द्यावे लागेल. त्याने संघात स्थिरता आणली आणि संघात लढाऊ भावना निर्माण केली.” असे उथप्पा म्हणाला. पुढे, तो म्हणाला की गेल्या हंगामात केकेआरला जेतेपद जिंकून देऊन देखील अय्यरला सोडण्यात आले होते. त्याच्यावर यापेक्षा मोठा अन्याय काय होऊ शकतो?
श्रेयस अय्यर कर्णधारपद आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपली भूमिका चोख बजावत आहे. रॉबिन उथप्पा पुढे म्हणाला की, आता श्रेयस अय्यर अशा संघात गेला आहे जिथे त्याला साध्य करायला खूप काही आहे. श्रेयस अय्यर सध्या त्याच्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. तरी देखील त्याला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले नाही.
श्रेयससाठी मागील हंगामाप्रमाणे, आयपीएलचे २०२५ हे वर्ष देखील शानदार ठरले आहे. या वर्षी त्याने त्याच्या बॅटच्या बळावर संघाला टॉप-२ मध्ये पोहचवले आहे. चालू हंगामात पंजाब किंग्जला विजेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जाऊ लागेल आहे. रॉबिनचा असा विश्वास आहे की या सर्वांनंतरही त्याला योग्य तो आदर देण्यात येत नाही.
भारत पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्याला जाणार आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने कसोटी संघाची घोषणा केलीय आहे. यावेळी श्रेयस अय्यरचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. विराट कोहलीच्या जागी तो संघात सामील होऊ शकतो अशा बातम्या आल्या होत्या. परंतु असे काही घडले नाही. आयपीएल व्यतिरिक्त, अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. यानंतर, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आपली प्रतिभा दाखवून दिली होती. हे सर्व असूनही, तो टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यात आपसीही ठरला.