Sarfaraz Khan warns BCCI after scoring century in Buchi Babu tournament
Sarfaraz Khan scores century in Buchi Babu tournament : बीसीसीआयच्या घरगुती स्पर्धेपूर्वी, भारताची एक मोठी आमंत्रित स्पर्धेला सुरवात झाली आहे. आपण बुची बाबू स्पर्धेबाबत बोलत आहेत. बुची बाबू आमंत्रित स्पर्धेत टॉप-१६ संघांचा आमंत्रित स्पर्धेत टॉप-१६ संघांचा समावेश असून या स्पर्धेत तामिळनाडूतील दोन संघ सहभागी आहेत. उर्वरित निवडक राज्यांमधून प्रत्येकी एक संघाचा समावेश आहे.
सरफराज खानला इंग्लंड दौऱ्यात बीसीसीआयने संघात स्थान दिले नव्हते. त्याने आता बुची बाबू च्या पहिल्या सामन्यात सरफराज खानने शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारतासाठी ६ कसोटी सामने खेळणाऱ्या सरफराज खानने मुंबईकडून खेळताना तामिळनाडू इलेव्हनविरुद्ध १३८ धावांची शानदार खेळी केली. निवृत्त होण्यापूर्वी, सरफराज खानने ११४ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांसह १३८ धावा फटकावल्या होत्या.
हेही वाचा : T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
सरफराज पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात आला. त्याने सुवेद पारकर (७२ धावा) सोबत चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. यानंतर, त्याने आकाश पारकरसोबत सहाव्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी उभी केली. सरफराजच्या या दमदार खेळीमुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात पुनरागमनाची आशा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
सरफराजने गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीत कसोटी पदार्पण केले होते, त्यावेळी त्याने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली होती आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीत १५० धावांची खेळी केली होती. तरीही, मे २०२५ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्याने त्याच्या तंदुरुस्तीवर काम करून या शतकाने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याचे काम केले आहे.
बुच्ची बाबू स्पर्धेनंतर, सरफराज खान २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेवर असणार आहे. तो शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाकडून खेळणार आहे. या संघात रुतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांचा देखील समावेश आहे. जर सरफराज दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर त्याला कसोटी संघात पुनरागमनाचा मार्ग सुखकर होईल.
हेही वाचा : AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! ‘या’ तीन दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वगळले
घरच्या मैदानावर भारताचा पुढील कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध २ ते १४ ऑक्टोबर दरम्यान अहमदाबाद आणि दिल्ली येथे खेळला जाणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना १४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता आणि गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे.