ऑस्ट्रेलियन टीमची घोषणा( फोटो-सोशल मीडिया)
AUS vs SA : ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची टी 20 मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया आता एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघातून स्टीव्ह स्मिथला वगळण्यात आले आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची शक्यता आहे. त्याच वेळी, कसोटी संघाबाहेर असलेल्या मार्नस लाबुशेन पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलियाआधी दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केला आहे.
मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धुरा टेंबा बवूमा सांभाळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच वेळी, कॅमेरॉन ग्रीन देखील या मालिकेत पुनरागमन करणार आहे. या मालिकेतून अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
हेही वाचा : IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटला रामराम केला आहे. त्यापूर्वी मार्कस स्टोइनिसने देखील या स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली होती. ऑस्ट्रेलियन संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वतःला पुन्हा स्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मागील काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी खालावलेली असल्याचे दिसत आहे. मागील पाच सामन्यांवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाने १११ धावा, १६४ धावा, १२२ धावा, १३४ धावा आणि तीन विकेट्सने पराभव स्वीकारला आहे. आता ऑस्ट्रेलियन संघ या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेला १९ ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. त्यानंतर पुढचा सामना २२ ऑगस्ट रोजी मॅके येथे खेळला खेळवण्यात येईल तर तिसरा आणि शेवटचा सामना २४ ऑगस्ट रोजी मॅके येथेच खेळला जाईल.
हेही वाचा : AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ जाहीर: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ नवीन चेहऱ्यांची लागली वर्णी
मिशेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी,बेन द्वारशुइस, कूपर कॉनोली, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन आणि अॅडम झांपा.