Saudi T20 League: Arab countries' terror! Competitions like IPL-The Hundred are in danger; Big league worth Rs 3442 crores..
Saudi T20 League : क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियामध्ये एक टी२० लीगला सुरवात होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. ज्या लीगमध्ये खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव केला जाणार आहे. अशी देखील माहिती समोर येत आहे की, या लीगच्या आगमनाने आयपीएल आणि द हंड्रेड सारख्या जगप्रसिद्ध लीगला मोठी झळ बसणार आहे. बीसीसीआय आणि द हंड्रेडला धोका पोहचवणाऱ्या या लीगविरोधात बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डने आवाज उठवला आहे. परंतु ऑस्ट्रेलियाला या लीगमध्ये आपले भविष्य पाहत आहे. यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया या लीगचा फायदा घेण्याच्या विचारात दिसत आहे.
हेही वाचा : Ind w vs Eng w : भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार ५ सामन्यांची टी२० मालिका; वाचा सामने कुठे खेळले जाणार..
ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ नुसार, बीसीसीआय आणि ईसीबी त्यांच्या खेळाडूंना या लीगमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी एनओसी देण्यास नकार देण्याची शक्यता आहे. म्हणजेच, भारत आणि इंग्लंडचे स्टार क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळताना दिसणार नाहीत.
अलीकडेच, लॉर्ड्स येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान, बीसीसीआय आणि ईसीबीच्या उच्च अधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर बैठक पार पडली. ज्यामध्ये हे दोन्ही देश या अरब लीगला पाठिंबा देणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! शिखर धवनचा नव्या क्षेत्रात डेब्यू; ‘बॅट’ सोडून चालवली ‘लेखनी’..
सौदी अरेबियाची ही प्रस्तावित लीग एसआरजे सुरू करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एसआरजे या लीगमध्ये ४०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर ही रक्कम सुमारे ३४४२ कोटी रुपये इतकी आहे. सौदी अरेबियाच्या या महत्त्वाकांक्षी लीगमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. जी ग्रँड स्लॅमच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणार आहे.
आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात शतक झळकवणाऱ्या भारताच्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या स्थानावर पोहोचला, त्याचे कारण इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत दोन शतके झळकावणे हे आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट घेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम आहे. इंग्लंडच्या विजयादरम्यान ६२ आणि १४९ धावा काढून सामनावीर ठरलेला बेन डकेट पाच स्थानांनी झेप घेऊन क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.