शिखर धवन(फोटो-सोशल मीडिया)
Shikhar Dhawan autobiography : भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटनंतर तो त्याच्या चाहत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन करत असतो. अशातच आता धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिखर धवनने त्याच्या आयुष्यातील प्रवास, अनुभव आणि संघर्षावर एक पुस्तक लिहिले आहे. धवनने ‘द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर’ या पुस्तकात क्रिकेट क्षेत्रातील त्याचे अनुभवच शेअर केले नाहीत तर त्याने मैदानाबाहेरील त्याचे नातेसंबंध, मैत्री, आव्हाने आणि वाद याबद्दल देखील मुक्तहस्ते लिहिले आहे.
धवन म्हणतो, “की क्रिकेटने मला जगण्याचा एक उद्देश दिला, परंतु या प्रवासात अनेक चढ-उतार आणि मूक क्षण देखील वाट्याला आले. या खेळाने मला आज मी जे काही आहे, जो व्यक्ती आहे तो बनवले. हे पुस्तक माझ्या हृदयातून आलेली एक खरी कहाणी आहे. प्रामाणिकपणे आणि कोणत्याही फिल्टरशिवाय.” पुस्तकाचे प्रकाशक, हे हार्पर कॉलिन्स इंडिया यांनी शिखर धवनच्या भावना आणि स्व-संवादाची एक अनोखी झलक म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
हेही वाचा : Ind w vs Eng w : भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार ५ सामन्यांची टी२० मालिका; वाचा सामने कुठे खेळले जाणार..
हार्पर कॉलिन्स इंडिया कंपनीचे प्रकाशक सचिन शर्मा यांनी सांगितले की, “शिखर धवनचे मैदानाच्या आत आणि बाहेरील जीवन खूप प्रेरणादायी असे आहे. या आठवणीत त्याने त्याच्या आयुष्याचे सर्व पैलू, नातेसंबंध, अनुभव आणि संघर्ष मोकळेपणाने शेअर केले असून हे पुस्तक वाचकांना त्याच्या खऱ्या आणि संवेदनशील प्रतिमेची ओळख करून देते.”
दिल्लीमध्ये वाढलेल्या शिखर धवनने विकेटकीपर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती, परंतु नंतर तो भारतीय संघाचा यशस्वी सलामीवीर म्हणून पुढे आला. त्याने भारतासाठी ३४ कसोटी सामन्यांमध्ये २३१५ धावा केल्या. त्याच वेळी, त्याने १६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६७९३ धावा केल्या. तर त्याने ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७५९ धावा फटकावल्या आहेत.
हेही वाचा : ‘..आणि त्यांच्यामुळेच कारकीर्द उद्ध्वस्त’, पृथ्वी शॉने स्वतःच केले सारे काही उघड; वाचून चक्रावून जाल..
धवनने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतची त्याची पहिली भेटही अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडली आहे. तो म्हणाला की, “जेव्हा मी धोनीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो एखाद्या बॉलिवूड स्टारसारखा दिसून आला होता. लांब केस, आकर्षक हास्य. आम्ही एकमेकांशी बोलत होतो आणि मी गंमतीने म्हणालो, ‘मला भारतासाठी खेळायचे आहे आणि तुला बॉलिवूडचा हिरो बनवायचे आहे.’ तेव्हा तो हसायला लागला होता.
शिखर धवनचे हे आत्मचरित्र केवळ एका क्रिकेटपटूचा केवळ प्रवासच नाही तर एका माणसाच्या भावना, आव्हाने आणि विजयांची एक कहाणी देखील आहे.