Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shafali Verma चा ‘धुमाकूळ’, ४९ चेंडूत तुफानी शतक अन् मोडले ७ रेकॉर्ड्स, मंधानाचाही विक्रम केला धुळीस

Shafali Verma Scored 1st T20I Century Broke Mandhana Record: शफाली वर्माने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध शानदार शतक झळकावून इतिहास रचला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 20, 2026 | 09:08 PM
Shafali Verma Scored 1st T20I Century

Shafali Verma Scored 1st T20I Century

Follow Us
Follow Us:
  • शफालीची बॅट तळपली
  • ४९ चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास
  • मंधानालाही मागे टाकलं
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर शफाली वर्माने रविवारी (२० सप्टेंबर) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घातला. बांग्लादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शानदार शतक झळकावून शफालीने इतिहास रचला. आक्रमक फलंदाजी करत तिने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक ४९ चेंडूंमध्ये पूर्ण केले. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या शफालीने आपल्या ११८ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० धावांची नाबाद शानदार शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ३ चौकार आणि ९ जबरदस्त षटकार ठोकले. आपल्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय शतकासह शफालीने अनेक विक्रम मोडीत काढले. तिने केवळ एक-दोनच नव्हे, तर एकाच वेळी सात मोठे विक्रम आपल्या नावावर केले. या खेळीदरम्यान तिने भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाच्या नावावर असलेला विक्रमही मोडला.

Asian Games 2026: फायनलचा थरार रंगणार! सुवर्णपदकासाठी भारत-श्रीलंकेची हाय-व्होल्टेज टक्कर; ‘या’ दिवशी भिडणार

महिला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी वेगवान शतक

२२ वर्षीय शफाली वर्माने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये आपले पहिले टी२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. यासह, शफाली महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी संयुक्तपणे सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरली आहे. तिच्या आधी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने २०१८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४९ चेंडूंमध्ये शतक झळकावून हा पराक्रम केला होता. परंतु, सर्वात वेगवान शतकाचा विक्रम वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटिनच्या नावावर आहे. तिने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ ३८ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक ठोकणारी पहिली महिला फलंदाज

शफाली वर्माने आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावून इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारी ती पहिली महिला फलंदाज आहे. याआधी कोणत्याही महिला खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावले नव्हते. इतकेच नव्हे तर, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली आहे.

शफालीने स्मृती मंधानाचा विक्रम मोडला

बांग्लादेशविरुद्ध शतक झळकावताना शफालीने ९ षटकार ठोकले. यानंतर, ती महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार मारणारी भारतीय फलंदाज ठरली. तिने या बाबतीत स्मृती मंधानाचा विक्रम मोडला. आता टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शफालीच्या नावावर एकूण १०४ षटकार आहेत, तर मंधानाने १०० षटकार ठोकले आहेत.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज

शफालीने २०२६ मध्ये आपल्या बॅटने षटकार ठोकत आणखी एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. ती आता महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज ठरली आहे. शेफालीने २०२६ मध्ये आतापर्यंत ३५ षटकार मारून, २०२४ मध्ये ३२ षटकार मारणाऱ्या चमारी अट्टापट्टूचा विक्रम मोडला आहे.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू

शफाली महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू ठरली आहे. तसेच, २०२६ मधील महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिने दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंत ८१५ धावांसह ती केवळ लॉरा वॉल्व्हार्डच्या मागे आहे.

एका डावात ९ षटकारांचा रेकॉर्ड

शफालीने बांग्लादेशविरुद्धच्या आपल्या नाबाद शतकामध्ये ९ षटकार ठोकले आणि एका डावात नऊ षटकार मारणाऱ्या महिला टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ५०+ धावा

शफालीने एका कॅलेंडर वर्षात ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा एक महत्त्वपूर्ण विक्रमही प्रस्थापित केला आहे.तिने यावर्षी आधीच आठ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करून स्मृती मंधानाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई

Web Title: Shafali verma t20i century 7 records asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Shafali Verma
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
1

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Asian Games 2026: फायनलचा थरार रंगणार! सुवर्णपदकासाठी भारत-श्रीलंकेची हाय-व्होल्टेज टक्कर; ‘या’ दिवशी भिडणार
2

Asian Games 2026: फायनलचा थरार रंगणार! सुवर्णपदकासाठी भारत-श्रीलंकेची हाय-व्होल्टेज टक्कर; ‘या’ दिवशी भिडणार

Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली
3

Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली

Asian Games 2026: भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा! इलावेनिल-सोनम-विदर्साचा अचूक निशाणा, १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक
4

Asian Games 2026: भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा! इलावेनिल-सोनम-विदर्साचा अचूक निशाणा, १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.