Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईला ‘लॉर्ड्स’ पावला! शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आसामची फलंदाजी उद्ध्वस्त

मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसाम विरुद्ध ५ विकेट्स घेऊन आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. ठाकूरच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ९८ धावांनी विजय मिळवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 02, 2025 | 07:49 PM
Syed Mushtaq Ali Trophy: 'Lord's' step to Mumbai! Assam's batting was ruined in front of Shardul Thakur's bowling

Syed Mushtaq Ali Trophy: 'Lord's' step to Mumbai! Assam's batting was ruined in front of Shardul Thakur's bowling

Follow Us
Close
Follow Us:

Syed Mushtaq Ali Trophy 2025 : मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. आसामविरुद्धच्या सामन्यात शार्दुलने आग ओकणारी गोलंदाजी केली. त्याच्या तीन षटकांच्या छोट्या स्पेलमध्ये विरोधी फलंदाजीचा क्रम उध्वस्त झाला. त्याने पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळे मुंबईला सामन्यात एकतर्फी  विजय मिळवण्यात यश आले.

हेही वाचा : Ashes series 2025: इंग्लंडकडून अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा! 3 वर्षांनंतर ‘या’ खेळाडूला लागली लॉटरी

आसामचा ९८ धावांनी पराभव

प्रथम फलंदाजी करताना, सर्फराज खानच्या शानदार शतकामुळे मुंबईने २२० धावांचा डोंगर उभा केला. २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आसाम सुरुवातीपासूनच खचलेला दिसून आला. संपूर्ण संघाला फक्त १२२ धावाच करता आल्या आणि मुंबईने ९८ धावांनी सामना आपल्या नावे केला. फलंदाजांसोबतच आसामचे गोलंदाज देखील निष्प्रभ ठरला आहे.

पहिल्या षटकात शार्दुलच्या तीन विकेट्स

शार्दुल ठाकूरने आसामच्या डावाची सुरुवातच उध्वस्त करून टाकली. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर दानिश दासला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर अवघ्या चार धावांवर अब्दुल कुरेशीला देखील माघारी पाठवले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर आसामचा कर्णधार रियान परागला देखील शार्दुलच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. अशाप्रकारे, शार्दुल ठाकूरने पहिले षटकात आसामची धार बोथट केली.

दुसऱ्या षटक टाकण्यास आलेल्या शार्दुलने सुमितला फक्त एका धावेवर माघारी पाठवले. आसामचे फलंदाज त्याच्यासमोर पूर्णपणे असहाय्य दिसून आले. विरोधी संघाचे पाच खेळाडू दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाहीत. शार्दुल ठाकूरने ३ षटकात अवघ्या २३ धावा देत ५ बळी घेतल्याने सामन्याचे वळणच बदलले.

सरफराज खानची स्फोटक शतकी खेळी

आसामविरुद्धच्या सामन्यात आयुष म्हात्रे आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील सलामीच्या भागीदारीनंतर, सरफराज खानने फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी करत शतक ठोकले. त्याने ४७ चेंडूत नाबाद १०० धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत सरफराजने ८ चौकार आणि ७ लांब षटकार ठोकले.

हेही वाचा : IND vs SA: विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI अडचणीत! रोहित शर्माकडून मात्र आला होकार

दुसऱ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणे आणि तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासोबत केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे मुंबईने आपला पाया मजबूत केला. सरफराजच्या स्फोटक खेळीमुळे, संघ २० षटकांत मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला. परिणामी ठाकूरच्या घटक गोलंदाजीसमोर आसाम संघ टिकू शकला नाही आणि त्यांना ९८ धावांनी पराभव पत्करावा लागला.

शार्दुल ठाकूर आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग

शार्दुल ठाकूर आता आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. एमआयने त्याला लखनौ सुपर जायंट्सकडून खरेदी केले असून गेल्या हंगामात तो एलएसजीकडून खेळला होता. त्याने एलएसजीकडून शार्दुलने १० सामन्यांमध्ये १३ बळी टिपले होते.  त्याच्या  पुनरागमनामुळे मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणाला अधिक बळकटी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Shardul thakur takes 5 wickets as mumbai beat assam in syed mushtaq ali trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • shardul thakur
  • Syed Mushtaq Ali Trophy

संबंधित बातम्या

Syed Mushtaq Ali Trophy : सरफराज खानची स्फोटक फलंदाजी! गोलंदाजांवर चढवला हल्लाबोल; निवडकर्त्यांना दिला इशारा
1

Syed Mushtaq Ali Trophy : सरफराज खानची स्फोटक फलंदाजी! गोलंदाजांवर चढवला हल्लाबोल; निवडकर्त्यांना दिला इशारा

Syed Mushtaq Ali Trophy : दुखापतीनंतर हार्दिक पांड्याची डरकाळी! बॅटने उडवून दिली खळबळ; संघाला मिळवून दिला एकहाती विजय 
2

Syed Mushtaq Ali Trophy : दुखापतीनंतर हार्दिक पांड्याची डरकाळी! बॅटने उडवून दिली खळबळ; संघाला मिळवून दिला एकहाती विजय 

 वैभव सूर्यवंशीचा Syed Mushtaq Ali Trophy मध्ये धूमधडाका! शतक झळकावून केला ‘हा’ पराक्रम
3

 वैभव सूर्यवंशीचा Syed Mushtaq Ali Trophy मध्ये धूमधडाका! शतक झळकावून केला ‘हा’ पराक्रम

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6…अभिषेक शर्माचा कहर! फक्त 33 चेंडूत झळकावले तुफानी शतक, Syed Mushtaq Ali स्पर्धेत धुव्वाधार कामगिरी
4

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6…अभिषेक शर्माचा कहर! फक्त 33 चेंडूत झळकावले तुफानी शतक, Syed Mushtaq Ali स्पर्धेत धुव्वाधार कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.