इंग्लंडकडून अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs ENG : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन संघात प्रतिष्ठित अॅशेस मालिका खेळवण्यात येत आहे. पहिली कसोटी इंग्लंडसाठी खूपच वाईट ठरली. पाहिला कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांतच संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पाहुण्या संघाचा ८ विकेट्सने धुव्वा उडवण्यात आला. या दारुण पराभवानंतर, इंग्लंड आता दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करण्याच्या इराद्यात आहे. ४ डिसेंबरपासून गॅब्बा येथे खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, इंग्लंड संघ व्यवस्थापनाने नवीन प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
हेही वाचा : Ind vs Sa odi series: ‘विराटच्या भविष्याबद्दल चिंता…’फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांचे विधान चर्चेत
इंग्लंडकडू त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे बाहेर पडला असून त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू विल जॅक्सला संधी दिली गेली आहे. २७ वर्षीय जॅक्सने डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत, त्याने रावळपिंडी येथे फलंदाजीच्या स्वर्गात सहा बळी घेऊन सर्वांचे लक्ष्य वेधले होते. तरी देखील त्याला संघात आपले स्थान टिकवता आले नाही.
आता मात्र, जवळजवळ तीन वर्षांनंतर, त्याला दुसरी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लिश चाहत्यांना त्याच्याकडून अॅशेस मालिकेत उपयुक्त फिरकी आणि जलद धावा करण्याच्या क्षमतेने चांगली कामगिरी करेल. आतापर्यंत, जॅक्सने इंग्लंडसाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ८९ धावा केल्या आहेत आणि सहा बळी घेण्यात यश आले आहे.
विल जॅक्सच्या देशांतर्गत केलेल्या कामगिरीवरून हे स्पष्ट होते की त्याची कारकीर्द गोंधळात टाकणारी होती. गेल्या दोन हंगामात त्याने फक्त पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तर २०२५ काउंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याची गोलंदाजीची सरासरी ३८.८० इतकी होती. जर त्याने या कसोटीत एकही बळी घेतला तर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचा ५० वा बळी असणार आहे.
कसोटींमधून त्याची अनुपस्थिती असून देखील इंग्लिश संघ व्यवस्थापनाकडून मर्यादित षटकांच्या स्वरूपात त्याचा सातत्याने वापर करण्यात आल आहे. केला आहे. त्याने एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याची कामगिरी सरासरी राहिली आहे, त्याला फक्त नऊ विकेट्स घेता आल्या आहेत. उन्हाळ्यात मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमसोबत अतिरिक्त काम केल्यामुळे कसोटी संघात त्याला संधी देण्यात आली आहे. यामुळे ऑक्टोबरमध्ये त्याला दोन वर्षांचा केंद्रीय करार देखील देण्यात आला.
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), विल जॅक्स, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.






