चिली : शुक्रवारी चिली येथील फुटबॉल स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एका सामन्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत फुटबॉल स्टेडियमच्या स्टँडचा काही भाग हा सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर कोसळला. यात काही प्रेक्षक जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चिलीयन फुटबॉल क्लब कोलो कोलोच्या सराव सत्रादरम्यान झाली. यावेळी कोलो कोलो क्लबचे फॅन्स स्टेडियमवरील जाहिरातीच्या बोर्डवर चढल्याने इस्ताडियो मोन्यूमेंटलचा काही भाग कोसळला. असा दावा केला जात आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता जवळपास ४५ हजार इतकी आहे. या स्टेडियमवर सध्या हंगामाचा सुरूवातीचे सराव सत्र आयोजित करण्यात आले होते.
? LO ÚLTIMO | Momento en qué la estructura colapsa en el Estadio Monumental por arengazo de Hinchas de Colo Colo. (@rodrigogomezf)pic.twitter.com/jHjL11RSjc
— Alerta News Chile (@AlertaNewsCL) September 30, 2022
मात्र काही चाहत्यांच्या अतिउत्साहीपणामुळे ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत अनेक चाहते जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व चाहते स्टेडियमच्या उद्घाटनाला ३३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एकत्र जमले होते.