WTC मध्ये मोठी उलथापालथ! आफ्रिकेने बांग्लादेशला लोळवले पण फायदा 'या' संघाला; भारताचे काय होणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघांच्या आशा अद्याप जिवंत आहेत. भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलमध्ये बदल
साऊथ आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश सिरीज
Published on: 
Updated on: 
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलमध्ये बदल

  • साऊथ आफ्रिकेचा बांग्लादेशवर विजय

  • बांग्लादेशचा संघ टॉप 5 मधून बाहेर

BAN Vs SA: नुकतीच साऊथ आफ्रिका आणि बांग्लादेश या दोन संघांमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरीज पार पडली. या दोन्ही सामन्यात साऊथ आफ्रिकेने बांग्लादेशचा पराभव केला आहे. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. साऊथ आफ्रिकेने दुसरा कसोटी सामना एक डाव आणि 219 रन्सच्या फरकाने जिंकला आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलबाबत जाणून घेऊयात.

दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसरा आणि शेवटचा सामना साऊथ आफ्रिकेने बांग्लादेशविरुद्ध सामना 1 इनिंग आणि 219 रन्सच्या फरकाने जिंकला आहे. या विजयासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले.

IND vs NZ: दुसऱ्या कसोटीत कर्णधार गिलचा मोठा गेमप्लॅन! सिराजचं कमबॅक, प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कट? कशी असेल भारताची Playing 11

सेंचुरियन कसोटी सामन्याच्या निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत. या सामन्यात बांग्लादेशचा पराभव झाल्याने इंग्लंडच्या संघाला फायदा झाला आहे. इंग्लंडने थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे साऊथ आफ्रिकेने आपले पहिले स्थान अधिक पक्के केले आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये क्रमवारी कशी आहे?

1. साऊथ आफ्रिका

2 . ऑस्ट्रेलिया

3. न्यूझीलंड

4. भारत

5. इंग्लंड

6. बांग्लादेश

Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघांच्या आशा अद्याप जिवंत आहेत. भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी भ्रतला पुढील 6 च्या 6 सामने जिंकणे आवश्यक आहे. WTC २०२५-२७ च्या गुणतालिकेत भारतीय संघ सध्या ५० टक्के गुणांसह (PCT) चौथ्या स्थानी आहे. भारताला उर्वरित प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

दुसऱ्या कसोटीत कर्णधार गिलचा मोठा गेमप्लॅन

वेगवान गोलंदाजी विभागातही बदल होऊ शकतात. प्रसिद्ध कृष्णा पहिल्या कसोटीत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे, त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.सिराजच्या पुनरागमनामुळे जसप्रीत बुमराहसोबत भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत होईल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अंशुल कंबोज/आकाश दीप, जसप्रीत बुमराह, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज.

Q

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका कोणी जिंकली?

A

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली.

Q

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा किती धावांनी पराभव केला?

A

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा एक डाव आणि 219 धावांनी पराभव केला.