Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Messi India Tour : मेस्सीच्या शो दरम्यान गोंधळ प्रकरण! क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी दिला राजीनामा

पश्चिम बंगालमधील साल्ट लेक स्टेडियममध्ये एका कार्यक्रमामधून मेस्सी स्टेडियममधून लवकर गेलयाने हिंसाचाराची घटना घडली. या घटनेनंतर क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी राजीनामा दिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 17, 2025 | 03:33 PM
Messi India Tour: Chaos during Messi's show! Sports Minister Arup Biswas has resigned.

Messi India Tour: Chaos during Messi's show! Sports Minister Arup Biswas has resigned.

Follow Us
Close
Follow Us:

Sports Minister Arup Biswas has resigned : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी नुकताच भारताला भेट देऊन गेला. भारतात आल्यानंतर तो सुरवातीला पश्चिम बंगालमधील साल्ट लेक स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. तिथे मेस्सी स्टेडियममधून लवकर गेलयाने चाहते नाराज झाले आणि हिंसाचाराची घटना घडली. या घटनेनंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बिस्वास यांनी १५ डिसेंबर रोजी क्रीडा विभागाच्या पदावरून राजीनामा देऊन “निष्पक्ष चौकशी” करण्याची मागणी देखील केली होती. त्यांचा राजीनामा स्वीकारताना, मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांची  भावना आणि हेतूंचे कौतुक केले जात आहे.

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : सूर्याआर्मी मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार मैदानात! दक्षिण आफ्रिकेसमोर बरोबरी साधण्याचे ध्येय

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर राज्य सरकारकडून पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कुमार आणि विधाननगरचे पोलिस आयुक्त मुकेश कुमार यांना “कारणे दाखवा नोटीस” बजावण्यात आली आहे. विधाननगरचे उपायुक्त अनिश सरकार यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार सिन्हा आणि साल्ट लेक स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी देब कुमार नंदन यांच्यावर देखील विभागीय कारवाई केली आहे.

या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश आशिष कुमार रॉय यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली गेली होती.  ज्याच्या आधारे चार वरिष्ठ आयपीएस अधिकारी पीयूष पांडे, जावेद शमीम, सुप्रतिम सरकार आणि मुरलीधर यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) देखील स्थापन करण्यात आले. स्टेडियममधील गोंधळ आणि व्यवस्थापनातील निष्काळजीपणाची एसआयटी सखोल चौकशी करणार आहेत.

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी साधला निशाणा

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्याकडून आरोप करण्यात आले आहे की, क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी या कार्यक्रमासाठी २२,००० तिकिटे गोळा केली, ती त्यांच्या समर्थकांना वाटण्यात आली. तसेच काही बेकायदेशीर बाजारात देखील विकली आहेत. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचे ठोस पुरावे सापडल्याचा दावा देखील अधिकारी यांनी केला आहे. हिंसाचारानंतर राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी त्यांनी  एका दिवसात स्टेडियमला ​​भेट दिली आणि चौकशीसाठी न्यायालयीन कारवाईची शिफारस देखील केली. पोलिसांनी आतापर्यंत कारवाई  करत आयोजक शताद्रु दत्ता आणि पाच प्रेक्षकांना अटक केली आहे.

हेही वाचा : IPL 2026 Mini Auction: लिलावात ‘या’ ५ खेळाडूंवर झाली कोट्यवधींची उधळण! भारतीय अनकॅप्ड खेळाडूंचे नशीब पालटले

 

Web Title: Sports minister arup biswas has resigned over the chaos during messis show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 03:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.