SL A vs PAK A : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला रडवंल, आता फलंदाजांवर असणार ट्रॉफी जिंकण्याची मदार

एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम सामन्यात श्रीलंका 'ए'च्या गोलंदाजांनी पाकिस्तान 'ए'ला रोखले. रविंदू फर्नांडोने तीन बळी घेतले, तर पाकिस्तानच्या शाहबाज खानने 60 धावांची खेळी केली. आता विजेतेपदासाठी श्रीलंकेच्या फलंदाजांवर मदार असेल.
SL A vs PAK A : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला रडवंल, आता फलंदाजांवर असणार ट्रॉफी जिंकण्याची मदार
SL A vs PAK A : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला रडवंल, आता फलंदाजांवर असणार ट्रॉफी जिंकण्याची मदारफोटो सौजन्य : एक्स
Published on: 
Updated on: 
  • रायझिंग स्टारचा बादशाह कोण? लवकरच निकाल

  • अष्टपैलू रविंदू फर्नांडोची चमकदार कामगिरी

  • पाकिस्तानकडून शाहबाजचे अर्धशतक

SLA vs PAKA : एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम सामन्यात श्रीलंका 'ए' संघाने पाकिस्तान 'ए' संघाला पहिल्या डावात चांगलंच रडवलं. श्रीलंकेची गोलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण सर्वात ते उजवे ठरले. त्यांनी टॉस जिंकत प्रथम फलंदाजीस आलेल्या पाकिस्तानला फक्त 9 बाद 216 धावा करू दिल्या. त्यांच्याकडून शाहबाद खान (60)ने एकमेव अर्धशतक केले. आता स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या पहिल्या फळीतील फलंदाजांना टिकून फलंदाजी करावी लागेल.

श्रीलंकेकडून रविंदू फर्नांडो (26/3) आणि गरुका संकेथ (46/3) यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत, महत्त्वाच्या फलंदाजांना पॉव्हेलियनचा रस्ता दाखवला.

अष्टपैलू रविंदू फर्नांडोची चमकदार कामगिरी

तसं पाहता, श्रीलंकेनं गोलंदाजीप्रमाणेच क्षेत्ररक्षणातही चमकदार कामगिरी केली. पण रविंदू फर्नांडोच्या गोलंदाजीने सामन्यात चार चाँद लावले. त्याने सलामीला आलेला माझ सदाकत (5), खेळपट्टीवर एकमेव टिकून अर्धशतक ठोकणारा पाकिस्तानचा फलंदाज शाहबाज खान (60) आणि फरान युसूफ (7) यांचा काटा काढला. त्याने निर्धारित 10 षटकात 2.60 च्या सरासरीने 26 धावा देत तीन महत्त्वाचे बळी टिपले.

तर त्याच्यानंतर गरुका संकेथनेही (46/3) तीन विकेट घेतल्या, तर नुजा सहानने दोन विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

SL A vs PAK A : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला रडवंल, आता फलंदाजांवर असणार ट्रॉफी जिंकण्याची मदार
WWE च्या रे मिस्टेरियोची निवृत्तीची घोषणा; 12 जून 2027 रोजी खेळणार अखेरचा सामना

पाकिस्तानकडून शाहबाजचे अर्धशतक

पाकिस्तानची सुरुवात खूपच धिमी राहिली. त्यांनी तिसऱ्याच षटकात 13 धावांवर आपला पहिला विकेट माझ सदाकतच्या रुपात गमावला. तर सलामीला आलेला शामल हुसेन 40 धावा करत माघारी परतला. कर्णधार अब्दुल समद आणि शाहबाज खान यांनी पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली. हिच एकमेव मोठी भागीदारी पाकिस्तानच्या वतीने पार पडली.

या काळात शाहबाजने 91 चेंडूंत 4 चौकारांसह 60 धावा केल्या. तर समद 33 धावा करत बाद झाला. या तिघानंतर रोहिल नाझिर हाच 37 धावा करत दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहचू शकला.

SL A vs PAK A : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला रडवंल, आता फलंदाजांवर असणार ट्रॉफी जिंकण्याची मदार
BJP President Nitin Nabin: नितीन नबीन यांच्यासमोर असणार आव्हानांचा डोंगर; बंगाल- आसाममध्ये लागणार कस