फोटो सौजन्य - सोशल मीडिया
वानिंदू हसरंगा : श्रीलंकेचा संघ आगामी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये श्रीलंकेच्या संघाला दोन कसोटी सामान्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर संघ पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन ट्रॉफी खेळणार आहे. श्रीलंकेचे अनेक खेळाडू गोलंदाज आहेत त्यांची जगभरामध्ये चर्चा केली जाते. आता श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट टी-२० मध्ये ३०० बळींचा टप्पा गाठून इतिहास रचला आहे.
सर्वात कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठून त्याने विश्वविक्रम केला आहे. शारजाह वॉरियर्स आणि डेझर्ट वायपर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ३ विकेट घेतल्यावर ILT20 दरम्यान ही कामगिरी केली. हसरंगाला विकेटचे त्रिशतक पूर्ण करण्यासाठी २०८ सामने लागले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू टायच्या नावावर होता. टायने २११ सामने खेळून ३०० बळी घेतले.
यासह हसरंगा ३०० टी-२० विकेट घेणारा श्रीलंकेचा पहिला फिरकीपटू आणि एकूण तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम दिग्गज लसिथ मलिंगाने केला होता. या यादीत अफगाणिस्तानचा रशीद खान, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान आणि दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर तिसऱ्या स्थानावर आहे.
२०८ – वानिंदु हसरंगा*
२११ – अँड्र्यू टाय
२१३ – राशिद खान
२२२ – लसिथ मलिंगा
२४३ – मुस्तफिजुर रहमान
२४७ -इमरान ताहिर
हसरंगाचा T२० रेकॉर्ड खूपच प्रभावी आहे, गेल्या वर्षी तो श्रीलंकेसाठी १०० T20I विकेट घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज बनला होता. त्याने केवळ ६३ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. हसरंगाच्या T20 विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या २०९ सामन्यांमध्ये ३०१ विकेट घेतल्या आहेत, त्यापैकी त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३१ विकेट घेतल्या आहेत.
Wanindu Hasaranga becomes the FASTEST bowler to take 300 T20 wickets.
Fastest (by matches)
208 – Wanindu Hasaranga*
211 – Andrew Tye
213 – Rashid Khan
222 – Lasith Malinga
243 – Mustafizur Rahman
247 – Imran Tahir#ILT20 pic.twitter.com/pbg7mbaOlj— Kausthub Gudipati (@kaustats) January 25, 2025
काही दिवसांपूर्वी आयसीसीने एकदिवसीय टीम ऑफ द इयरसाठी संघाची घोषणा केली होती. यामध्ये श्रीलंकेच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले होते. यात पाठुम निस्संका, कुशल मेंडिस आणि चारिथ असलंका या खेळाडूंना २०२४ च्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. चारिथ असलंका याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. टेस्ट २०२४ टीम ऑफ द इयरमध्ये कामिंदू मेंडिस याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. वानिंदु हसरंगा याला T२० टीम ऑफ द इयरसाठी संघामध्ये स्थान मिळाले आहे. यामध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे.