Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट म्हणून बाद ठरणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज; या निर्णयावर क्रिकेटविश्वातून टीका, वाचा फलंदाज बाद होण्याचे प्रकार

  • By युवराज भगत
Updated On: Nov 06, 2023 | 09:03 PM
Sri Lankan fans upset after Angelo Mathews was given time out

Sri Lankan fans upset after Angelo Mathews was given time out

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh vs Sri Lanka World Cup 2023 : विश्वचषकाच्या ३८व्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान मोठा वाद झाला होता. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइमआऊट होणारा तो पहिला फलंदाज ठरला. या संपूर्ण प्रकरणामध्ये सोशल मीडियावर काही लोक मॅथ्यूजवर आरोप करत आहेत, तर काही लोकांनी बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनच्या खेळाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बांगलादेशी खेळाडूंना बराच वेळ प्रतीक्षा

वास्तविक, २५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जेव्हा सदीरा समरविक्रमा बाद झाला तेव्हा अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. मॅथ्यूज जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा त्याने चुकीचे हेल्मेट आणले होते. त्याने राखीव खेळाडूला दुसरे हेल्मेट आणण्यास सांगितले. त्यामुळे पंच आणि बांगलादेशी खेळाडूंना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. तो हेल्मेट घेऊन वेळेवर येऊ शकला नाही त्यामुळे शाकिबने श्रीलंकन संघ वेळकाढूपण करत असल्याची तक्रार केली. यानंतर पंचांनी मॅथ्यूजला आऊट दिले.
शाकिबने अपील मागे घेतले नाही
मॅथ्यूजने शाकिब-अल-हसनशी संवाद साधला. शाकिबने अपील मागे घेतले नाही. त्यानंतर मॅथ्यूज रागाने पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने हेल्मेट आणि ग्लोव्हज डगआऊटमध्ये फेकले. श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडही या संपूर्ण घटनेने चांगलेच संतापलेले दिसले. त्यामुळे नेमके क्रिकेटचे नियम काय आहेत आणि फलंदाज किती पद्धतीने बाद होऊ शकतो यावर एक नजर टाकूया.

आयसीसीचे काय नियम आहेत?
क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मिरिलिबोन क्रिकेट क्लबनुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, येणाऱ्या फलंदाजाने तीन मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर नवीन येणारा फलंदाज टाईम आऊट होईल. एकूण ११ पद्धतीने फलंदाज आपली विकेट गमावू शकतो.

१.बोल्ड (त्रिफळाचीत)

फलंदाज जेव्हा फटका मारण्यात अपयशी ठरतो किंवा हुकतो तेव्हा चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळतो त्याला त्रिफळाचीत असे म्हणतात. जेव्हा तीन स्टंप्स आणि दोन बेल्स यांच्यापैकी कशालाही चेंडू लागून ते आपल्या जागेवरून विलग होतात तेव्हा बोल्ड असं लिहिलं जातं.

२.कॉट (झेलबाद)

फलंदाजाने टोलवलेला चेंडू जेव्हा यष्टीरक्षक किंवा अन्य क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो आणि तो झेलतो त्याला कॉट किंवा झेलबाद म्हटलं जातं. यष्टीरक्षक स्टंप्सच्या मागे झेल पकडू शकतो. यष्टीरक्षक आणि स्लिपमध्ये उभे असलेल्या क्षेत्ररक्षकांनी झेल पकडला त्याला कॉट बिहाइंड अर्थात स्टंप्सच्या मागे झेलबाद असं म्हटलं जातं.

३.लेग बिफोर विकेट (पायचीत)

कोणताही वैध चेंडू फलंदाजाच्या पायाला किंवा अन्य भागाला बॅटला स्पर्श होण्यापूर्वी लागला आणि तो चेंडू जर स्टंप्सला लागत असेल तर त्यावेळी एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीत बाद दिलं जातं.
४.रनआऊट (धावबाद)

फलंदाज जेव्हा फटका मारून धाव काढतात तेव्हा ती पूर्ण करताना विकेटकीपर एन्डला किंवा बॉलर एन्ड असलेल्या क्रीझमध्ये बॅट असणं अपेक्षित असतं. फलंदाज धाव पूर्ण करत असताना तो किंवा बॅट क्रीझमध्ये नसेल आणि त्याचवेळी यष्टीरक्षक किंवा गोलंदाज तसंच अन्य क्षेत्ररक्षकाने स्टंप्स-बेल्स उडवल्या तर रनआऊट दिलं जातं.

५.स्टंपिंग (यष्टीचीत)

मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज जेव्हा क्रीझबाहेर जातो, चेंडूचा अंदाज न आल्याने तो हुकतो आणि यष्टीरक्षक त्यावेळी चेंडू पकडून झटपट स्टंप्स आणि बेल्स उडवतो त्याला स्टंपिंग म्हटलं जातं. हा एकप्रकारे रनआऊटचाच प्रकार आहे.

६.रिटायर्ड (निवृत्त)

फलंदाज दुखापतीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे खेळताना पंचांच्या परवानगीविना तंबूत परतला. परतल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या संमतीने जेव्हा तो पुन्हा खेळण्यासाठी येतो तेव्हा फलंदाजी सुरू करू शकतो. तो निर्धारित वेळेत खेळायला परत आलाच नाही तर त्याला आऊट दिलं जाऊ शकतं.

७.हिट द बॉल ट्वाईस

फलंदाजाने गोलंदाजाला चेंडू टाकल्यानंतर एकदाच खेळण्याची संधी मिळते. एकदा फटका खेळल्यानंतर फलंदाजाने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला तर नियमानुसार आऊट दिलं जाऊ शकतं. फलंदाजाने बॅटने किंवा शरीराच्या एखाद्या भागाने दुसऱ्यांदा खेळणं नियमानुसार चुकीचे आहे.

८.हिट विकेट (स्वत:च्या चुकीने बाद होणे)

फलंदाज जेव्हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात असताना त्याची बॅट किंवा शरीराचा कोणताही भाग स्टंप्सवर, बेल्सवर आदळला तर हिट विकेट दिलं जातं. मोठा फटका मारताना किंवा स्वीप करताना फलंदाज संतुलन गमावतो आणि तो स्वत:च स्टंप्सवर आदळतो किंवा त्याची बॅट, हेल्मेट, अन्य वस्तूंपैकी एखादी गोष्ट स्टंप्सवर जाऊन आदळते त्यावेळी त्याला बाद दिले जाते.

९.ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड

फलंदाजाच्या कृतीने किंवा मुद्दामहून जेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला रोखण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड’नुसार आऊट दिलं जातं.

१०.टाईम आऊट

एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येतो. या बदलासाठी तीन मिनिटं मिळतात. पॅव्हेलियनमध्ये तयार असलेल्या फलंदाजाला क्रीझवर पोहोचण्यासाठी हा वेळ मिळतो. त्यावेळेत फलंदाज जर मैदानात खेळायला पोहोचला नाही तर त्याला टाईम आऊट दिलं जातं.

११.हँडल द बॉल

फलंदाजाने हाताने चेंडू रोखायचा प्रयत्न केला तसंच चेंडू आपल्यादिशेने येत असताना हाताने किंवा शरीराच्या कोणत्याही भागाने थांबवण्याचा प्रयत्न केल्यास ‘हँडल द बॉल’ नियमामुसार आऊट दिलं जाऊ शकतं.

Web Title: Sri lankan fans upset after angelo mathews was given time out how many types of dismissals are there in cricket find out nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2023 | 08:56 PM

Topics:  

  • Angelo Mathews

संबंधित बातम्या

SL vs BAN : ‘निवृत्तीचा निर्णय भावनिक करणारा..’, अखेरच्या कसोटी सामन्यानंतर Angelo Mathews चा दाटून आला कंठ..  
1

SL vs BAN : ‘निवृत्तीचा निर्णय भावनिक करणारा..’, अखेरच्या कसोटी सामन्यानंतर Angelo Mathews चा दाटून आला कंठ..  

“तू तुझ्या देशाचा खरा सेवक..”, Angelo Mathews च्या निवृत्तीवर भारताच्या माजी कसोटी कर्णधाराची भावुक संदेश; पाहा Video
2

“तू तुझ्या देशाचा खरा सेवक..”, Angelo Mathews च्या निवृत्तीवर भारताच्या माजी कसोटी कर्णधाराची भावुक संदेश; पाहा Video

Test Cricket Retirement : श्रीलंकन क्रिकेटला मोठा झटका! ‘या’ दिग्गज अष्टपैलू खेळाडूने कसोटी क्रिकेटला ठोकला राम राम.. 
3

Test Cricket Retirement : श्रीलंकन क्रिकेटला मोठा झटका! ‘या’ दिग्गज अष्टपैलू खेळाडूने कसोटी क्रिकेटला ठोकला राम राम.. 

श्रीलंकेचा दिग्गज Angelo Mathews ने केला कसोटी क्रिकेटला अलविदा!
4

श्रीलंकेचा दिग्गज Angelo Mathews ने केला कसोटी क्रिकेटला अलविदा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.