Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुडाळमध्ये पालकमंत्री चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन, २५० स्पर्धक होणार सहभागी

कुडाळमध्ये वरिष्ठ राज्य मानांकन पालकमंत्री चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३ विश्वविजेते, २७ आंतरराष्ट्रीय खेळाडू, १४ राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ५० खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतील. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा कॅरम असोसिएशन मार्फत आपली नावे देण्याची अंतिम तारीख आज १९ सप्टेंबर २०२४ ही आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 19, 2024 | 10:33 AM
कुडाळमध्ये राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन, २५० स्पर्धक होणार सहभागी

कुडाळमध्ये राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन, २५० स्पर्धक होणार सहभागी

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वरिष्ठ राज्य मानांकन पालकमंत्री चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे दिनांक २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रिडा प्रकोष्ठ, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा “पालकमंत्री चषक” स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेला खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळेल.

हेदेखील वाचा- राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्राला घवघवीत यश, विविध राज्यातून 300 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग

कुडाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, क्रीडा प्रकोष्ठ जिल्हा संयोजक योगेश फणसळकर, कॅरम असोसिएशनचे सुनील धुरी, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, श्रीपाद तवटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, देवेंद्र सामंत, राजा धुरी, भाई बेळणेकर, संयोजक विश्वास पांगुळ, माजी सभापती मोहन सावंत इत्यादी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये राज्यभरातून सुमारे २५० ते ३०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. ३ विश्वविजेते, २७ आंतरराष्ट्रीय खेळाडू, १४ राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ५० खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतील. सध्याचा विश्वविजेता मुंबई उपनगरचा संदिप दिवे, त्या आधीचा विश्वविजेता आणि विश्वचषक विजेता रिझर्व बँकेचा मुंबईचा प्रशांत मोरे व पुणे येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा दोन विश्वविजेते पद, विश्वचषकासह ५८ आंतराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता योगेश परदेशी हे या कॅरम स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार.

हेदेखील वाचा- चौथी ‘स्पार्टन मान्सून लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; रायझिंग बॉईज क्लब उपांत्यपूर्व फेरीत

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन ही देशात नव्हे तर संपूर्ण जगात अग्रेसर कॅरम संघटना आहे. त्यांचे सोशल मिडियावर ३ लाख फॉलोअर्स आहेत. आपल्या या राज्यस्तरीय स्पर्धेतील सुमारे ५० सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगभरातले कॅरम रसीक पाहतील. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन मान्यता प्राप्त सुरको किंग या २४ कॅरम बोर्डवर खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी कोल्हापूर येथील बीएसएनएलचे सुर्यकांत पाटील व कुडाळ येथील मधुकर पेडणेकर हे दोन राष्ट्रीय कॅरम पंच, प्रमुख पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आंतराष्ट्रीय कॅरम पंच अजित सावंत हे तांत्रिक अधिकारी तर शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतराष्ट्रीय कॅरम खेळाडू अरुण केदार हे स्पर्धा निरीक्षक अधिकारी म्हणून उपस्थित असतील. भारतीय जनपा पार्टी क्रिडा प्रकोष्ठ जिल्ह्यात गठीत झाल्यानंतरचा हा पहिलाच मोठा उपक्रम संपन्न होत आहे.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष पद भुषविले आहे. जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या स्पर्धेच्या नावामागे असलेली कल्पना सांगितली. त्यांनी सांगितलं की, पालकमंत्री चषक या नावामागे संकल्पना अशी आहे की, दरवर्षी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत ही कॅरमची राज्यस्तरीय स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा कॅरम असोसिएशन मार्फत आपली नावे देण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२४ ही आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात आपल्या जिल्हयातील २ गुणवंत कॅरमपटू मुलींनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले, ही बातमी पालकमंत्र्यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी जाहीर कार्यक्रमामधे त्यांचं कौतुक करून त्यांना नवे कोरे कॅरमबोर्ड देऊन प्रोत्साहीत केले होते.

या स्पर्धेच्या घोषणेनंतर आपले खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर इत्यादींनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत व स्पर्धेच्या उद्घाटन, पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनने ४ राज्यस्पर्धा व वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचे यजमानपद यशस्वीपणे भुषविले आहे. सावंतवाडी येथील २०१९ च्या वरिष्ठ राज्य कॅरम मानांकन स्पर्धेनंतर ५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यस्तरीय स्पर्धा पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये होत असल्याचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

Web Title: State ranking carrom competition organized in kudal sindhudurg 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 10:33 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.