Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Steve Smith : गोलंदाज हादरले, स्टीव्ह स्मिथने घातला गोंधळ 64 चेंडू, 121 धावा…

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथची गणना सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याला IPL-२०२५ च्या मेगा लिलावात खरेदीदार मिळाला नाही. मात्र, आता स्मिथने त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 11, 2025 | 02:02 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

स्टीव्ह स्मिथ : भारताच्या संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली आणि यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ३-१ ने पराभूत केले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाची सर्वात मजबूत खेळ म्हणजेच त्यांची फलंदाजी. ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन यासारखे एकशे एक फलंदाज संघामध्ये असताना त्यांना पराभूत कारण भारतासाठी आव्हान होतंच. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ मागील काही महिन्यांपासून तो चांगल्या फॉरमध्ये नव्हता पण जेव्हा तो चांगली खेळी खेळतो तेव्हा समोरच्या गोलंदाजांचा घाम सुटतो.

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथची गणना सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. विशेषत: कसोटीच्या फॉरमॅटमध्ये त्याला खूप पुढे ठेवले जाते. T२० मध्ये त्याची गरज कमी लेखली गेली आहे आणि म्हणूनच त्याला IPL-२०२५ च्या मेगा लिलावात खरेदीदार मिळाला नाही. मात्र, आता स्मिथने त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने बिग बॅश लीगमध्ये शतक झळकावले आहे. स्मिथ आपल्या देशातील बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळत आहे. शनिवारी पर्थ स्कॉचर्सविरुद्ध खेळताना त्याने दमदार खेळी केली. स्मिथने शानदार शतक झळकावले आहे. त्याने १२१ धावांची नाबाद खेळी खेळली ज्यामुळे त्याचा संघ २० षटकात ३ गडी गमावून २२० धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.

“Shot of the night!” How good is this from Steve Smith! #BBL14 pic.twitter.com/tdRqZf07Yn — KFC Big Bash League (@BBL) January 11, 2025

स्मिथ जोश फिलिपसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला होता. फिलिप अवघ्या नऊ धावा करून बाद झाला, पण स्मिथने तुफानी शैली दाखवत पर्थच्या गोलंदाजांची कोंडी केली. दरम्यान, कुर्टिस पॅटरसनही १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्मिथला पुन्हा कर्णधार मोइसेस हेन्रिक्सची साथ मिळाली. दोघांनी मिळून ११३ धावांची भागीदारी केली. स्मिथने अवघ्या ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

१७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेन्रिक्स बाद झाला. त्याने २८ चेंडूंत सहा चौकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये स्मिथ उभा राहिला तरी त्याने अप्रतिम वादळ निर्माण केले. बेन द्वारशुइसने त्याला साथ दिली. त्याने सात चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद २३ धावा केल्या.

IND vs ENG : इंग्लडविरुद्ध मालिकेत अर्शदीप सिंग इतिहास रचणार का? चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान जवळजवळ पक्के

स्मिथची ही खेळी जेव्हा तो नुकताच कसोटी क्रिकेट खेळून परतला आहे. असे म्हटले जाते की, कसोटीतून टी-२० कडे वळणे अवघड आहे, पण स्मिथने कसोटी मालिकेनंतर पहिला टी-२० सामना खेळला आणि शतक झळकावले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची बॅट चांगली खेळली होती. या मालिकेत त्याने दोन शानदार शतके झळकावली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याने ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १०१ धावा केल्या होत्या. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने शतक झळकावले होते. या डावात त्याने १४० धावा केल्या होत्या.

Web Title: Steve smith scored 64 balls and scored 121 runs in t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • Big Bash League
  • cricket

संबंधित बातम्या

NZ vs WI : कॉनवे आणि मिशेलचे अर्धशतक… टिकनरच्या अनुपस्थितीत मायकेल चमकला; न्यूझीलंडने राखले वर्चस्व
1

NZ vs WI : कॉनवे आणि मिशेलचे अर्धशतक… टिकनरच्या अनुपस्थितीत मायकेल चमकला; न्यूझीलंडने राखले वर्चस्व

वैभव सुर्यवंशी की आयुष म्हात्रे कोणाची चालणार बॅट? वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची Live Streaming
2

वैभव सुर्यवंशी की आयुष म्हात्रे कोणाची चालणार बॅट? वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची Live Streaming

AUS vs ENG : उस्मान ख्वाजा तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत खेळेल की पाच दिवस बेंचवर? मायकेल क्लार्कचा मोठा दावा
3

AUS vs ENG : उस्मान ख्वाजा तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत खेळेल की पाच दिवस बेंचवर? मायकेल क्लार्कचा मोठा दावा

U19 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा! भारतीय वंशाच्या 2 खेळाडूंचा समावेश
4

U19 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा! भारतीय वंशाच्या 2 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.