फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
महिला T२० विश्वचषक २०२४-टीम इंडिया : महिला T२० विश्वचषक २०२४ ची स्पर्धा रंगतदार होत चालली आहे. विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलायचं झालं तर भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भारताच्या संघाने दमदार कमबॅक करत भारताच्या संघाने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून सामान नावावर केला होता. त्यानंतर गुणतालिकेमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. त्यानंतर भारतीय संघाचा ९ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा सामना श्रीलंका विरुद्ध झाला. या सामन्यात भारताच्या संघाने आशिया चॅम्पियनशिपचा बदल घेत श्रीलंकेच्या संघाला ८२ धावांनी पराभूत केलं.
भारताने आशियाई चॅम्पियन्सचा ८२ धावांनी पराभव करून केवळ दोन मौल्यवान गुणच मिळवले नाहीत तर त्यांचा निव्वळ धावगतीही सुधारली. टीम इंडियाच्या या विजयामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा वाढल्या आहेत. श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर भारत अ गटातील गुणतालिकेत टॉप-२ मध्ये पोहोचला आहे. आता फक्त गतविजेता ऑस्ट्रेलिया टीम इंडियाच्या पुढे आहे. भारताचा लीग टप्प्यातील पुढील आणि शेवटचा सामना कांगारूंविरुद्ध आहे, त्यानंतर उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होईल.
श्रीलंकेवरच्या या विजयासह भारताने ICC महिला T२० विश्वचषक स्पर्धेतील गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर दोन स्थानांनी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी भारत -१.२१७ च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर होता. पाकिस्तानविरुद्ध विजयाचे खाते उघडल्यानंतरही, टीम इंडियाचा निव्वळ धावगती नकारात्मक होता कारण त्यांना स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून दारूण पराभव पत्करावा लागला होता. पण आता श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारताचा निव्वळ धावगती +0.576 झाला आहे, जो गट-अ मधील दुसरा सर्वोत्तम आहे.
अ गटाच्या गुणतालिकेत, पाकिस्तान आता 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि +0.555 च्या निव्वळ रन रेटसह आणि न्यूझीलंड समान गुणांसह आणि -0.050 च्या निव्वळ रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे. या गटात श्रीलंका हा एकमेव संघ आहे ज्याचे खातेही अद्याप उघडलेले नाही. या संघाने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने गमावले आहेत.