सुनील छेत्री हे फुटबॉलमधील अत्यंत नावाजलेले नावा. मात्र गुरूवारी मैदानावर सर्वांना भावूक करत सुनील छेत्रीने निवृत्ती स्वीकारली. कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक 2024 क्वालिफायर सामन्यात अनिर्णित खेळून भारताने आपला तुफानी स्ट्रायकर सुनील छेत्रीला निरोप दिला. भारत जिंकला असता, तर छेत्रीसाठी ही निवृत्ती अधिक अविस्मरणीय ठरली असती. मात्र हा सामना अनिर्णित राहिल्याने त्याच्या क्वालिफायरच्या तिसऱ्या फेरीत पोहोचण्याच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे.
हा सामना अनिर्णित राहिल्याने भारताचे आता पाच गुण झाले आहेत. त्यामुळे 11 जून रोजी शेवटचा सामना आशियाई चॅम्पियन कतारविरुद्ध खेळला जाणार आहे. कुवेतचे चार गुण झाले असून त्याच दिवशी अफगाणिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
सुनील छेत्रीची कारकीर्द
भारतीय फुटबॉलची ओळख असलेल्या 39 वर्षीय छेत्रीने या सामन्यासह आपल्या 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला. त्याने भारतासाठी 94 गोल केले. पोर्तुगालचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो (128), इराणचा दिग्गज अली दाई (108) आणि अर्जेंटिनाचा करिष्माई खेळाडू लिओनेल मेस्सी (106) नंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. सुनील छेत्रीमुळे पुढची पिढी अधिक प्रेरित झाल्याचेही दिसून येते.
उत्तम कामगिरी करणारा खेळाडू
The word ‘Legend’ is not enough to describe you ?
Thank you for everything, #SunilChhetri! ???pic.twitter.com/9dcZoCniER
— KolkataKnightRiders (@KKRiders) June 6, 2024
भारतासारख्या देशाच्या खेळाडूसाठी ही मोठी कामगिरी आहे आणि 16 मे रोजी जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली तेव्हा फिफानेही त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. छेत्रीला निरोप देण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. सॉल्ट लेक स्टेडियमची क्षमता 68000 प्रेक्षकांची आहे आणि संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले होते. वडील खरगा आणि आई सुशीला आणि पत्नी सोनम भट्टाचार्य यांच्याशिवाय अनेक अधिकारी आणि माजी खेळाडूंचाही त्यात समावेश होता.
[read_also content=”सुनील छेत्रीचा शेवटचा सामना https://www.navarashtra.com/sports/farewell-to-indian-football-captain-sunil-chhetri-cristiano-ronaldo-534019/”]
शेवटच्या सामन्यात एकही गोल नाही
मात्र, शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात छेत्रीला एकही गोल करता आला नाही, याची खंत प्रेक्षकांच्या मनात नक्कीच राहिली आहे. यानंतर सुनील छेत्री क्लब फुटबॉल खेळणे सुरूच ठेवणार आहे. इंडियन सुपर लीग संघ बेंगळुरू एफसीसोबत पुढील वर्षापर्यंत त्याचा करार आहे. छेत्रीने 12 जून 2005 रोजी क्वेटा येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तो सामना १-१ असा बरोबरीत संपला. त्या सामन्यात छेत्रीने एक गोल केला होता पण गुरुवारी शेवटच्या सामन्यात तो ही कामगिरी करू शकला नाही.