पीवायसी स्नूकर अँड बिलियर्ड्स लीग
बिलियर्ड्सच्या सामन्यात सुप्रीम एसेसच्या रोहित सुगंधीने स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या अमित भडभडेचा १००-९७ असा पराभव करत एसेसला पुन्हा आघाडी मिळवून दिली.त्यानंतर ६ रेड स्नूकर एकेरी सामन्यात स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या आदित्य देशपांडेने सुप्रीम एसेसच्या कर्णा मेहताचा ४३-२४ असा पराभव केला. त्यामुळे सामन्यात पुन्हा चुरस निर्माण झाली. यानंतर ६ रेड स्नूकर दुहेरी प्रकारात स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या दिव्यांशु गोरेने विशाल भुरटच्या साथीत सुप्रीम एसेसच्या हर्षद शहा व नकुल पटेल यांचा ४२-२३ असा पराभव करत स्ट्रायकर्सला आघाडी मिळवून दिली.
Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..
सामना हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर सुप्रीम एसेसने जोरदार पुनरागमन केले. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये एसेसच्या श्री शिरोडकरने स्ट्रायकर्सच्या संजीव आगाशेचा ३-२ असा पराभव करत संघाचे आव्हान कायम ठेवले. यानंतर झालेल्या निर्णायक ब्लू बॉल शूटआऊटमध्ये सुप्रीम एसेसच्या प्रकाश वाळंबेने स्कायलाईन स्ट्रायकर्सच्या आरिन माळीचा २-० असा पराभव केला. या विजयासह सुप्रीम एसेसने अंतिम सामना ४-३ असा जिंकत सलग दुसऱ्यांदा पीवायसी स्नूकर अँड बिलियर्ड्स लीगचे विजेतेपद मिळवले.
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी क्लबच्या स्नूकर अँड बिलियर्ड्स विभागाचे सचिव नंदन डोंगरे, परंपरा बिर्याणीचे संचालक गुरु चिल्लाळ, तसेच आमोद प्रधान, शिरीष साठे, रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय
· सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू : विशाल मल्होत्रा
· सर्वाधिक आश्वासक खेळाडू : रोहित सुगंधी
· सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू : आदित्य देशपांडे
· सर्वोच्च ब्रेक – बिलियर्ड्स : राजवर्धन जोशी
· सर्वोच्च ब्रेक – स्नूकर : निमिश कुलकर्णी
· सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्स खेळाडू : राजवर्धन जोशी
· सर्वोत्कृष्ट स्नूकर खेळाडू : निमिश कुलकर्णी
· सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू : अरुण बर्वे
· सर्वोत्कृष्ट दुहेरी खेळाडू : गुरु चिल्लाळ व शक्ती चितळे
· सर्वोत्कृष्ट ब्लू बॉल खेळाडू : प्रकाश वाळंबे
· सर्वोत्कृष्ट ब्लॅक बॉल खेळाडू : यश शहा
· स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : आनंद आपटे






