
Syed Mushtaq Ali Trophy 2025: Duckhu from the Indian team, now the same player takes a hat-trick! Claims claim for the T20 World Cup
Syed Mushtaq Ali Trophy 2025 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने खेळून झाले आहेत. ही मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० संघाचा भाग असणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी विचार करण्यात आला नव्हता. परिणामी, आता नितीश रेड्डीने निवडकर्त्यांना आपले कौशल्य दाखवत निवडकर्त्यांचे लक्ष्य वेधले आहे. आंध्र प्रदेशकडून खेळणाऱ्या रेड्डी यांनी राष्ट्रीय प्रीमियर स्पर्धेतील, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक घेऊन कहर केला आहे.
हेही वाचा : IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचा भीम पराक्रम! भारतीय भूमीत ‘हा’ कारनामा करणारा जगातील ठरला पहिलाच संघ
मध्य प्रदेशविरुद्ध प्रथम खेळताना, आंध्र प्रदेश संघ ११२ धावांवर गारद झाला. रेड्डींनी त्या सामन्यात सर्वाधिक २५ धावा फटकावल्या. नंतर रेड्डीने त्याच्या हॅटट्रिकने मध्य प्रदेशच्या छावणीत खळबळ उडवली. एकेकाळी मध्य प्रदेशचा स्कोअर विनाबाद १४ धावा होता. पण तिथून, त्याने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट घेत मध्य प्रदेशला अडचणीत आणले. नितीशने बाद केलेल्या फलंदाजांमध्ये रजत पाटीदारचा देखील समावेश होता, पण तो आपले खाते देखील उघडू शकला नाही. रेड्डीच्या कामगिरीनंतर त्याने आपली क्षमता दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी टी २० विश्वचषकासाठी रेड्डीची निवड होणार का याकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे.
टीम इंडिया आणि पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान फक्त नऊ सामने शिल्लक असून गौतम गंभीर संघात आणखी प्रयोग करताना दिसत आहे. अजित आगरकर आणि कंपनीच्या दृष्टीने टी-२० विश्वचषकासाठी १२-१३ खेळाडू निश्चित झाले असतील हे खरे असले तरी आता संघात अष्टपैलू खेळाडूंचा समावेश वाढताना दिसत आहे. शिवम दुबे ८ व्या क्रमांकावर खेळणार आहे, तर रेड्डी हा दुसरा पर्याय समोर अल आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की, नितीश कुमार रेड्डीमुले विश्वचषकासाठी संघाच्या निवडीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे का? याबबात आता प्रश्न निर्माण झाले आहत.