दक्षिण आफ्रिका संघ(फोटो-सोशल मीडिया)
South Africa created history in India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल चंदीगड येथे पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दूसरा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५१ धावांनी जिंकला. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने एक इतिहास देखील रचला आहे. भारतीय भूमीत भारताला ५० किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत करणारा दक्षिण आफ्रिका जगातील पहिलाच संघ ठरला आहे.
यापूर्वी, भारताला टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच पत्करावा लागला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये, दक्षिण आफ्रिकेने इंदूरमध्ये भारताला ४९ धावांनी धूळ चारली होती. आता मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला ५१ धावांनी पराभूत करून एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. आता, दक्षिण आफ्रिकेने भारतात भारताला सर्वाधिक धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले आहे. घरच्या मैदानावर टी-२० क्रिकेटमध्ये हा भारताचा सर्वात मोठा पराभव (धावांच्या फरकाने) ठरला आहे.
दुसरा सामना मुल्लानपूर येथील नव्याने बांधलेल्या महाराजा यादवींद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकच्या ४७ चेंडूत सात षटकार आणि पाच चौकारांसह ९० धावांच्या जोरावर २१३ धावा केल्या होत्या.
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला १६२ धावाच करता आल्या. भारताकडून तिलक वर्माने (६२ धावा) चांगली खेळी केली असली तरी, उर्वरित फलंदाज त्याला साथ मिळू शकली नाही. परिणामी भारताला ५१ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.






