Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तस्किन अहमदने रचला इतिहास! बांगलादेशसाठी टी२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम

२५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने टी२० मध्ये बांगलादेशसाठी १०० बळी पूर्ण करून इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 26, 2025 | 02:15 PM
Taskin Ahmed creates history! He did 'this' Bhim feat in T20 cricket for Bangladesh

Taskin Ahmed creates history! He did 'this' Bhim feat in T20 cricket for Bangladesh

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानकडून बांगलादेश ११ धावांनी पराभूत
  • पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात तस्किन अहमदने रचला इतिहास 
  • तस्किन अहमदने टी२० मध्ये बांगलादेशसाठी १०० बळी पूर्ण

Taskin Ahmed created history : आशिया कपमधील(Asia cup 2025)सुपर ४ सामन्यात २५ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने मोठी कामगिरी केली आहे. त्याने आशिया कपच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध विकेट घेऊन इतिहास रचला आहे. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने टी२० मध्ये बांगलादेशसाठी १०० बळी टिपले आहेत.  हा विक्रम करणारा तो बांगलादेशचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : IND vs AUS : Vaibhav Suryavanshi ने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केला पराक्रम! वेदांत त्रिवेदीने केला कहर

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानला माघारी पाठवली. अहमदचा हा टी २० क्रिकेटमधील १०० वा बळी ठरला. टी२० क्रिकेटमध्ये किमान १०० फलंदाजांना बाद करणारा तो शकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांच्यानंतर तिसरा बांगलादेशी गोलंदाज ठरला आहे.

वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने फरहानला रिशाद हुसेनकरवी झेलबाद केले. त्यानंतर तस्किनने शाहीन आफ्रिदीला देखील माघारी पाठवले.  तस्किनने त्याच्या शेवटच्या षटकात मोहम्मद नवाजला बाद करून सामन्यातील आपला तिसरा बळी टिपला. नवाज २५ धावांवर पव्हेलीयनमध्ये परतला.

दुबई येथे दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर २०२५ च्या आशिया कपमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाने नानेफक गमावून प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाने ८ विकेट्स गमावून १३५ धावा केल्या होत्या. हा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मर’ असा होता. या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेश संघाला केवळ १२४ धावाचा करता आल्या. परिणामी पाकिस्तान संघाने हा सामना ११ धावांनी जिंकला.

हेही वाचा : IND vs SL Asia Cup 2025 : संजू सॅमसनसह हे 3 खेळाडू आज बाहेर राहणार…अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग 11

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

पाकिस्तान : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.

बांगलादेश : सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, झाकीर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान. महेदी हसन,तस्किन अहमद

Web Title: Taskin ahmed creates history by taking 100 wickets in t20 cricket for bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • BAN vs PAK
  • Taskin Ahmed

संबंधित बातम्या

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा
1

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती
2

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.