केकेआर विरुद्ध पंजाब किंग्ज सामना रद्द (फोटो- सोशल मिडिया)
अजिंक्य रहाणेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
पहिल्या 2 ओव्हर्समध्ये गमावल्या 2 विकेट्स
पावसामुळे केकेआर विरुद्ध पीबीकेएस सामना रद्द
Tata IPL 2026 PBKS Vs KKR Live Updates: कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना पार (KKR Vs PBKS) पडला. आजचा सामना केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा समजला (IPL) जात होता. दरम्यान केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र केकेआरची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मात्र तीन ओव्हर्सचा खेळ झाल्यावर ईडन गार्डन्स स्टेडियम आणि परिसरात पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला.
दरम्यान हा पाऊस जवळपास 11 वाजेपर्यंत न थांबल्यामुळे अखेर हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे. पाऊस न थांबल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
देण्यात आलेला पावसाचा अंदाज
आजच्या केकेआर विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यात ईडन गार्डन्स येथे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. साधारण 7.50 वाजता सुरू झालेला पाऊस 11 वाजण्याच्या सुमारास थांबला. त्यामुळे अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Match 1⃣2⃣ between @KKRiders and @PunjabKingsIPL has been called off due to wet outfield 🌧️ Both teams get a point each.#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvPBKS pic.twitter.com/FpRpfljBpo — IndianPremierLeague (@IPL) April 6, 2026
केकेआरची फलंदाजी
केकेआरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाकडून सलामीला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फील एलन मैदानात उतरले. मात्र फील एलन केवळ 7 चेंडूत 6 रन्स करून आउट झाला. तर कॅमेरून ग्रीनसुद्धा 4 रन्स करून बाद झाला. त्यामुळे केकेआरला सुरुवातीला मोठे धक्के बसले.
PBKS Vs KKR Live: पहिल्या विजयासाठी ‘अजिंक्य’ सेना सज्ज; रहाणेने घेतला ‘हा’ निर्णय
पंजाब किंग्जची गोलंदाजी
केकेआरविरुद्ध पहिली ओव्हर अर्शदीप सिंगने टाकली. त्यानंतर झेविअर बार्टलेटने फील एलन आणि कॅमेररून ग्रीनला पॉवर प्लेच्या पहिल्या तीन ओव्हर्समध्ये आउट केले.
सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, आंग्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, आरके सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, वैभव अरोरा, नवदीप सैनी, कार्तिक त्यागी, आशीर्वाद मुजारबानी.
RCB च्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये खळबळ; कोण कोणत्या स्थानी? एकदा वाचाच…
पंजाब किंग्ज : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, एस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, एमपी स्टॉइनिस, एम जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, युझवेंद्र चहल.






