Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC ने रेटिंगवरून गुजरातच्या स्टेडियमला दिला ‘सरासरी’चा दर्जा; खराब खेळपट्टीमुळेच टीम इंडियाने वर्ल्ड कप गमावल्याचे सांगितले कारण

IND vs AUS : आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या फायनलच्या पराभवाचे शल्य अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला, ज्याच्या खेळपट्टीला ICC ने 'सरासरी' रेटिंग दिले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 08, 2023 | 03:08 PM
India vs Australia Final Match Live

India vs Australia Final Match Live

Follow Us
Close
Follow Us:

ICC World Cup 2023, IND vs AUS : वर्ल्ड कप फायनच्या (ICC World Cup Final 2023) मॅचच्या पराभवाचे विश्लेषण करताना अनेक कारणे सांगता येतील परंतु प्रमुख कारण म्हणजे गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची (Narendra Modi Stadium) खराब खेळपट्टी हे सांगितले जात होते. आज आयसीसीच्या खुलाशावरून हेसुद्धा सिद्ध झाल्याचे दिसून आले.

19 नोव्हेंबर 2023 ला प्रत्येक भारतीयाच्या मनावर झालेले आघात आजही ताजे आहेत. तो दिवस देशातील कोणतीच व्यक्ती, कधीच विसरू शकणार नाही. याच दिवशी गुजरातमधील (Gujarat) नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया (Team India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात वर्ल्डकप 2023 (ICC World Cup) चा अंतिम सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाच वर्ल्डकप (World Cup 2023) ट्रॉफी उंचावणार हे प्रत्येक भारतीयानं मानत अगदी पक्क केलेलं, पण चतुर कांगारुंनी मोठ्या शिताफिनं टीम इंडियाला नमवलं आणि देशातील 140 कोटी लोकांचा हिरमोड झाला. आज त्या घटनेला तब्बल 19 दिवस उलटलेत. याच अंतिम सामन्याबाबत एक मोठा रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये टीम इंडिया अंतिम सामन्यात पराभूत होण्याचं कारण सांगण्यात आलं आहे.

टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळला

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवण्यात आला. ज्या खेळपट्टीवर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळला होता, त्या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) ‘सरासरी’ रेटिंग दिलं आहे. यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या पराभवाचं कारण सांगताना खेळपट्टीला जबाबदार धरलं होतं.

पाच विश्वचषक सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीनुसार, आयसीसीनं पाच विश्वचषक सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिलं आहे, ज्यामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचाही समावेश आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं सर्वात आधी प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 240 धावा केल्या. टीम इंडियाचं आव्हान स्विकारत मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं 43 षटकांत लक्ष्य गाठलं आणि विजय मिळवला.

राहुल द्रविडनं खेळपट्टीवरच फोडलेलं पराभवाचं खापर
बीसीसीआयच्या आढावा बैठकीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही अंतिम सामना गमावल्याबद्दल खेळपट्टीला जबाबदार धरलं होतं. रिपोर्ट्सनुसार, मुख्य प्रशिक्षक म्हणाले होते की, आम्हाला अपेक्षेप्रमाणे टर्न न मिळाल्यानं आम्ही हरलो. स्पिनर्सना योग्य तो स्पिन मिळाला असता, तर आपणच जिंकलो असतो. या रणनीतीनंच आम्ही पहिले 10 सामने जिंकलेत, पण अंतिम फेरीत मात्र ही रणनिती कामी आली नाही.

खेळपट्टी खराब मग ऑस्ट्रेलियानं शानदार खेळी कशी केली?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयसीसीनं नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पीचला सरासरी रेटिंग देत खेळपट्टी ‘चांगली’ नसल्याचं स्पष्टच केलं आहे. मग आता सर्वांच्या मनात प्रश्न येतोय की, खेळपट्टी खराब असल्यामुळे टीम इंडिया ढेपाळली, तर मग ऑस्ट्रेलियानं चांगली खेळी कशी केली? तर, त्यासाठी पूर्णपणे जबाबदार ठरला तो टॉस. खराब खेळपट्टीवर टीम इंडियानं टॉस गमावला आणि तिथेच वर्ल्डकपही गमावला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून सर्वात आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला 240 धावांवर थोपवलं. ऑस्ट्रेलियानं सर्वात आधी गोलंदाजी केल्यामुळे दिवसा खेळपट्टीनं त्यांना काही प्रमाणात साथ दिली. पण भारतीय क्रिकेट संघ गोलंदाजी करायला आला तोपर्यंत अंधार पडला होता आणि लाईट्स लागल्या होत्या. त्यासोबतच मैदानावर काही प्रमाणात दवही पडलं होतं. अशा परिस्थितीसमोर टीम इंडियाचे भेदक गोलंदाज काहीच करू शकले नाहीत. आपल्या सर्वांच्याच स्वप्नांचा चक्काचूर झाला.

Web Title: Team india lost world cup 2023 because of bad pitch big reveal from iccs average rating nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2023 | 02:50 PM

Topics:  

  • Narendra Modi Stadium
  • ODI World Cup 2023

संबंधित बातम्या

Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानची जीभ घसरली! ‘Operation Sindoor’ नंतर Narendra Modi Stadium बॉम्बने उडवून देण्याची धमकी.. 
1

Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानची जीभ घसरली! ‘Operation Sindoor’ नंतर Narendra Modi Stadium बॉम्बने उडवून देण्याची धमकी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.