फोटो सौजन्य - सोशल मीडिया
खो खो जागतिक विश्वचषक २०२५ : सध्या देशामध्ये खो खो जागतिक विश्वचषक २०२५ च्या स्पर्धा दिल्लीमध्ये सुरु आहेत. त्याचबरोबर खेळाडूची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतांडाचे सध्या कब्बडी आणि क्रिकेटची लोकप्रियता करोडोंच्या संख्येमध्ये आहे. आता भारतामध्ये त्याचबरोबर जगामध्ये खो खो खेळाला प्रसिद्ध त्याचबरोबर खेळाबद्दल जाणून घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करणे महत्वाचे होते. काल सेमीफायनलचे सामने झाले यामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीमध्ये पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पुरूष गटात भारतीय पुरुष संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा ६२-४२ असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या सत्रात भारताच्या प्रतीक वाईकर, आदित्य गणपुले ला ड्रीम रन पूर्ण करण्यापासून रोखून सुरेख सुरुवात केली. मेहुल व सचिन भार्गो या दुसऱ्या तुकडीने जोरदार आक्रमण केले, परंतु अनिकेत पोटेने २ मिनिटे ३८ सेकंद बचाव करत संघाला पुनरागमन करून दिले. पहिल्या सत्राअखेर दक्षिण आफ्रिका संघाने १८ गुणांची आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात निखिल बी याने सुरेख खेळ करत भारताला कमबॅक करून दिले. १४-२० अशी सामन्यात स्थिती असताना आदित्य गणपुले व गौतम एम यांनी उत्कृष्ठ खेळ करत संघाला दुसऱ्या सत्राअखेर २४-२० अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या खोझीने भारताच्या बचाव फळीचे आक्रमण मोडून काढले व भारतीय संघाला ऑल आऊट करून संघाला बरोबरी साधून दिली. रामजी कश्यप, पाबानी साबर, सुयश गरगटे या दुसऱ्या तुकडीने २ मिनिटे ३० सेकंद बचाव केला. पण दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या सत्रा अखेर आपली आघाडी ३८ गुणांनी कायम ठेवली. यावेळी सामना ४२-२८ असा होता.
अखेरच्या चौथ्या सत्रात भारताच्या आकाश कुमारने खोझा आणि मेहुला बाद करून सामन्यात रंगत आणली. सामना संपण्यास ५ मिनिटे १० सेकंद शिल्लक असताना ४ गुणांच्या फरकाने पिछाडीवर होता. यावेळी कर्णधार प्रतीक वाईकरने स्काय डायव्हिंगद्वारे खोझाला बाद करून संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत भारतीय संघाने आपली आघाडी कायम ठेवत अंतिम फेरी गाठली.
रविवारी, १९ जानेवारी २०२५ रोजी भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. नेपाळ संघाने उपांत्य फेरीत इराण संघाचा ७२-२९ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. यामध्ये सर्वोत्कृष्ट बचाव पटू म्हणून बोंगणी मिस्वेनी यांची निवड करण्यात आली होती तर सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून सचिन भार्गो यांची निवड करण्यात आली. सामनावीर पुरस्कार गौतम एमके याला देण्यात आला.