'Craziest birthday surprise in three decades...', spinner Yuzvendra Chahal emotional, RJ Mahvashan's head behind the celebration? Watch VIDEO
Yuzvendra Chahal’s birthday celebration : भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने नुकताच त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला आहे. युजवेंद्र चहलला त्याच्या ३५ व्या वाढदिवशी लंडनमध्ये मोठा सरप्राइज मिळाल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडीओ त्याने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, काही डान्सर्स युजवेंद्रसाठी डान्स करताना दिसत आहेत. तर भररस्त्यात आणि लोकांच्या घोळक्यात अचानक एक मुलगी येऊन युजवेंद्रचा हात पकडून त्याला बाजूला घेऊन जाते. त्यानंतर इतर डान्सर्स त्याच्यासमोर येऊन नाचायला लागतात. हे सर्व पाहून युजवेंद्र आश्चर्यचकीत होतो. सोबत तो भावुक झाल्याचे देखील दिसत आहे. 23 जुलै रोजी युजवेंद्रचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. या सरप्राइजचा व्हिडीओ पोस्ट करत चहलनकडून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. चहलने भावुक होऊन म्हटले आहे की, “गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच वाढदिवसाला अशा प्रकारे सरप्राइज मिळालं आहे.”
हेही वाचा : IND vs ENG : ब्रायडन कार्सने बॉल टेम्परिंग केली का? Viral Video मुळे सोशल मीडियावर खळबळ
“आम्हा मुलांचं कधी कधी संपूर्ण आयुष्य निघून जातं वाढदिवस साजरा न करता. गेल्या तीन दशकातील हा माझा पहिला आणि कदाचित सर्वांत वेडे बर्थडे सरप्राइज आहे. हे सर्व घडत असताना जग फिरत असल्याचे दिसत होते. मी स्तब्ध झालोय आणि या सरप्राइजसाठी खूप कृतज्ञ आहे. मी भारावून गेलो असून आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे असे मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवे. दरम्यान, हे सगळं खरंच घडलंय ही गोष्ट मी अजून देखील पचवण्याचा प्रयत्न करत आहे”, अशा शब्दांत युजवेंद्रने आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.
फिरकीपटू युजवेंद्र चहलला त्याची कथित गर्लफ्रेंड आरजे महवशनेकडूनचच हे बर्थडे सरप्राइज देण्यात आले असावे. अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा चंगल्याच रंगल्याचे दिसत आहे. अनेकदा चहल आणि महवश यांना एकत्र देखील पाहण्यात आले आहे. परंतु, दोघांनी आपल्या नात्यावर अद्याप कोणतीही अधिकृतया अशी प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान चहल सद्या भारतीय संघापासून दूर आहे. त्याने ऑगस्ट 2023 पासून भारताचं प्रतिनिधित्व केलेलं नाही. परंतु, तो अजूनही देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच तो आरजे महवशसोबत लंडनमध्ये दिसून आला होता. त्यामुळे त्याला मिळालेल्या सरप्राइजची चर्चा जास्तच वाढलेली दिसत आहे.
युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा हे या वर्षी वेगळे झाले आहेत. 2020 मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. तसेच कोर्टातील सुनावणीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्र यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते की, ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत होते.