फोटो सौजन्य - X (the hundred)
इंग्लडमध्ये सध्या द हंड्रेड सुरु आहे, यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू सामील होतात. भारतामध्ये ज्याप्रकारे आयपीएल लीग खेळवली जाते त्याचप्रकारे इंग्लडमध्ये द हंड्रेड लीग सुरु करण्यात आली आहे. हॅरि ब्रुक, बेथल सारखे खेळाडू यामध्ये सामील झाले आहेत. द हंड्रेड लीग सध्या इंग्लंडमध्ये खेळली जात आहे. त्यातील १६ वा सामना ओव्हल इनव्हिन्सिबल्स विरुद्ध वेल्श फायर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांच्या संघाने आक्रमक फलंदाजी केली आणि द हंड्रेडच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
ओव्हल इनव्हिन्सिबल्स हा द हंड्रेडमधील नीता अंबानींचा संघ आहे. ज्याने १६ व्या सामन्यात वेल्श फायरचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यात जॉर्डन कॉक्सने अद्भुत फलंदाजी केली. ज्यामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात ओव्हल इन्व्हिन्सिबल्सने प्रथम फलंदाजी करताना १०० चेंडूत ४ गडी गमावून २२६ धावा केल्या. ओव्हल इन्व्हिन्सिबल्सकडून फलंदाजी करताना जॉर्डन कॉक्सने २९ चेंडूत ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान कॉक्सने १० षटकार आणि ३ चौकार मारले.
A record total and a massive win for Oval Invincibles!
Scorecard: https://t.co/YI5sUSlMGh pic.twitter.com/fC8yDhdgMO
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 16, 2025
द हंड्रेड लीगच्या इतिहासातील हा सर्वोच्च धावसंख्या आहे. ओव्हल इन्व्हिन्सिबल्स संघाकडून या सामन्यात १७ षटकार मारण्यात आले. जॉर्डन कॉक्स व्यतिरिक्त, विल जॅक्सने २८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ३८ धावा आणि सॅम करनने १९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ३४ धावा केल्या. २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेल्श फायर संघ ९३ चेंडूत १४३ धावांवर ऑलआउट झाला.
वेल्श फायरकडून फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टोने २८ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान बेअरस्टोने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. याशिवाय ल्यूक वेल्सने १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावा केल्या. त्याच वेळी, वेल्श फायरचे ७ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ओव्हल इनव्हिन्सिबल्सकडून गोलंदाजी करताना टॉम करनने १८ चेंडूत सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय जेसन बेहरेनडॉर्फने ३ बळी घेतले.
या स्पर्धेचा फायनलचा सामना हा 31 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. महिला स्पर्धेच्या गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर साऊथेन ब्रेव वुमन तर पुरुष स्पर्धेच्या गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर ओव्हल इनव्हिन्सिबल्स मेन हा संघ आहे.