
The Pakistan team should have felt at least some shame! They pocketed the money meant for their own players.
The Pakistan team cheated the players : पाकिस्तान हॉकी संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉकी खेळाडूंकडून आरोप करण्यात आला आहे की, बोर्डाने त्यांना वचन दिलेल्यापेक्षा खूपच कमी पैसे देण्यात आले आहेत. आता ते खेळाडू पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या FIH प्रो लीगच्या दुसऱ्या फेरीत खेळण्यास नकार देत आहेत. या खेळाडूंनी असा आरोप केला आहे की, त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला खेळल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी त्यांचा पूर्ण दैनिक भत्ता दिला गेलेला नाही.
हेही वाचा : ICC Ranking : दीप्ती शर्माचा जलवा कायम! शेफाली वर्मा, रिचा घोषने दाखवली कमाल; वाचा सविस्तर
पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ हॉकी खेळाडूकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे की, अर्जेंटिनामधील प्रो लीग स्पर्धेदरम्यान पाकिस्तान हॉकी बोर्डाने त्यांना दररोज ३०,००० पाकिस्तानी रुपया (९६२५ भारतीय रुपये) देण्याचे आश्वासन दिले गेले होते, परंतु त्यांना फक्त ११,००० पाकिस्तानी रुपया (३५२९ भारतीय रुपये) देण्यात आले आहे. याचा अर्थ असा की आहे पाकिस्तानी संघाकडून त्यांची उघडपणे फसवणूक करण्यात आली आहे.
एका खेळाडूने सांगितले की, “या महिन्याच्या सुरुवातीला अर्जेंटिनामध्ये झालेल्या प्रो लीग स्पर्धेदरम्यान आम्हाला दरदिवशी ३०,००० पाकिस्तानी रुपयाचा भत्ता मिळेल असे आश्वासन आम्हाला दिले गेले होते.” गेल्या आठवड्यात, आमच्या खात्यात दैनिक भत्ता जमा करण्यात आला होता, परंतु केवळ ११,००० पाकिस्तानी रुपया जमा केले गेले होते, जी खेळाडूंची पूर्णपणे फसवणूक आहे.
हेही वाचा : IND W vs SL W : शफाली वर्माला खुणावतोय विश्वविक्रम! श्रीलंकेविरुद्ध 75 धावा करताच लिहिला जाईल इतिहास
एक गोष्ट म्हणजे आश्चर्यकारकपणे, पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडून बोलण्यात आले की, ते या प्रकरणात फार काही करू शकणार नाहीत. खेळाडूंना इतके पैसे मिळायला हवे होते हे मान्य करताना, त्यांच्याकडून आता नकार देखील दिला जात आहे. पीएचएफ सचिव राणा मुजाहिद म्हणाले की, “पीएचएफ धोरणानुसार, खेळाडूंना प्रत्येकी ३०,००० रुपये भत्ता देण्यात यायला हवा, तथापि, प्रो लीग हॉकी स्पर्धेच्या दोन्ही टप्प्यांचा सर्व खर्च पीएसबीकडून उचलण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणात फार काही करू शकत नाही.” पाकिस्तान संघाने अर्जेंटिनामध्ये आपले चारही सामने गमावले असून आता फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चार सामने खेळण्यात येणार आहेत. जर हा वाद सोडवला गेला नाही तर पाकिस्तानी संघासाठी लज्जास्पद असणार आहे.