दीप्ती शर्माचा जलवा कायम(फोटो-सोशल मीडिया)
The ICC has released the women’s T20 rankings : आयसीसीकडून महिला टी-२० रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. ताज्या रँकिंगमध्ये, अष्टपैलू दीप्ती शर्मा गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच रेणुका ठाकूरने गोलंदाजीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे, तर शेफाली वर्मा आणि रिचा घोषने फलंदाजीच्या क्रमवारीत दमदार उडी मारली आहे. दीप्ती शर्माने मागील आठवड्याप्रमाणेच महिला टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने आठ स्थानांनी झेप घेऊन टॉप १० मध्ये एंट्री केली आहे. ती आता आठ स्थानांनी झेप घेऊन सातव्या स्थानावर पोहचली आहे.
हेही वाचा : IND W vs SL W : शफाली वर्माला खुणावतोय विश्वविक्रम! श्रीलंकेविरुद्ध 75 धावा करताच लिहिला जाईल इतिहास
या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे, त्यानंतर पाकिस्तानची सादिया इक्बाल तिसऱ्या स्थानी आहे, इंग्लंडची सोफी एक्लेस्टन चौथ्या स्थानावर असून इंग्लंडची लॉरेन बेल पाचव्या स्थानावर आहे आणि दक्षिण आफ्रिकेची अॅन म्लाबा सहाव्या स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया वेअरहॅम आठव्या स्थानी असून तिला एक स्थान मागे जावे लागले आहे. इंग्लंडची चार्ली डेन नवव्या स्थानावर असून वेस्ट इंडिजची अॅफी फ्लेचर दहाव्या स्थानी आहे. दोघी देखील प्रत्येकी एक स्थानाने मागे घसरली आहे.
महिला फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी अव्वल स्थानी असून वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.तर भारताची स्मृती मानधना तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा चौथ्या स्थानी असून दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! PCB ने कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांना दिला नारळ
भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी करणारी सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने चांगलीच कमाल दाखवली आहे. तिने चार स्थानांनी झेप घेऊन सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंकेची कर्णधार चामारी अथापट्टू सातव्या स्थानावर आहे, दक्षिण आफ्रिकेची तंजीम ब्रिट्स आठव्या स्थानावर आहे, न्यूझीलंडची सुझी बेट्स नवव्या स्थानी आहे. भारताची जेमिमा रॉड्रिग्ज दहाव्या स्थानावर असून सातव्या ते दहाव्या स्थानावरील खेळाडूंची प्रत्येकी एक स्थान घसरण झाली आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर पंधराव्या स्थानावर असून भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिचाने ७ स्थानांनी झेप घेऊन २१ वे स्थान गाठले आहे.






