
What is the secret behind Vaibhav Suryavanshi's six hitting? Bowlers are afraid to face him; Read in detail
The mystery behind Vaibhav Suryavanshi’s six-hitting : वैभव सूर्यवंशी आपल्या फलंदाजी शैलीने चांगलाच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. रायझिंग स्टार्स आशिया कपमधील त्याच्या वादळी खेळीने त्याच्या शैलीविषयी आता चर्चा रंगू लागली आहे. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने १४ नोव्हेंबर रोजी युएई विरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत १४४ धावांची धमकेदार खेळी साकारली. या खेळीदरम्यान, त्याने १५ षटकार लगावले. त्याच्या फलंदाजीपूढे युएईचे गोलंदाज चांगलेच अडचणीत आले होते. डावखुरा वैभव सूर्यवंशीचे वर्चस्व त्याने एकामागून एक मारलेल्या षटकारांमुळे आणखी दिसून आले. आता अनेकांना हा प्रश्न पडल आहे की, तो इतके षटकार कसे मारतो? यामागे नेमके कारण काय? याबाबत आपण जाणून घेऊया.
वैभव सूर्यवंशीची षटकार मारण्याची कला कशी विकसित झाली?
वैभव सूर्यवंशीच्या षटकार ठोकण्याचे खरे गूढ त्याच्या पायात असल्याचे सांगितले जाते. ३४२.८५ च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या त्याच्या खेळीदरम्यान, वैभव सूर्यवंशीने चौकारांपेक्षा जास्त षटकारांची आतिषबाजी केली. त्याने ११ चौकार आणि एकूण १५ षटकार लगावले. वैभवने मारलेले षटकार इतके लांब होते की ते युएईच्या गोलंदाजांच्या भुवया उंचावत होत्या.
आता वैभव सूर्यवंशीच्या लांब षटकारांचे रहस्य त्याच्या पायात असल्याचे म्हटले जात असले तर टे कसे याबबत आपण माहीती घेऊ. १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची मांडी खूप जड आहे. शिवाय, त्याचे ग्लूट स्नायू बरेच मोठे आणि मजबूत असल्यामुळे त्याला लांब षटकार मारण्याची शक्ती प्राप्त होते. पायांव्यतिरिक्त, वैभव सूर्यवंशीचे हात देखील मजबूत आहेत. जो त्याला चेंडू दूरवर पाठवण्यास साहाय्य करतो.
हेही वाचा : Delhi blast : हाशिम अमलाचा ‘तो’ दावा ठरला खोटा! भारत असुरक्षित असल्याची पोस्ट झाली होती व्हायरल
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू हाशिम अमलाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अमलाने भारत असुरक्षित असल्याचे म्हटले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतातून परतण्याचा सल्ला देखील दिला होता. परंतु, आता ही पोस्ट खोटी असल्याची समोर आले आहे. अमलाशी संबंधित असणाऱ्या त्या पोस्टमध्ये असे देखील म्हटले होते की, ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना भारतात त्रास दिला जात आहे आणि आयसीसीने भारतात क्रिकेटवर बंदी घालण्यात यावी. ही पोस्ट एका पाकिस्तानी वापरकर्त्याकडून शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट २,५०,००० हून अधिक लोकांनी पाहिली असून अनेक वापरकर्त्यांनी ती लाईक आणि शेअर देखील केली आहे.