जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ या स्पर्धेला २० नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील ३२ संघ सहभागी होणार असून त्यांना आठ ग्रुपमध्ये विभागलं गेलं आहे. हा विश्वचषक कतार मध्ये रंगणार आहे. तर या स्पर्धेतील पहिला सामना कतार आणि इक्वाडोर (Qatar v Ecuador) यांच्यात होणार आहे. या फिफा विश्वचषकाचा फायनल सामना १८ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धेत २० नोव्हेंबरपासून ते २ डिसेंबरपर्यंत एकूण ४८ ग्रुप सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक ग्रुपमधील दोन अव्वल संघाला राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश करता येणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबरपासून नॉकआऊट सामने खेळले जातील, त्यानंतर आघाडीवर असलेल्या संघांचा क्वार्टर फायनल आणि फायनलचा मध्ये जाण्याचा प्रवास सुरु होईल. या संपूर्ण स्पर्धेत एकूण ६४ सामने खळले जाणार आहेत.
फिफा विश्वचषक २०२२ मधील ग्रुप
ग्रुप-ए: कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप-बी: इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप-सी: अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप-डी: फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप-ई: स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान
ग्रुप-एफ: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप-जी: ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप-एच: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया रिपब्लिक.