Chinnaswamy Stadium Stampede: '..then the stampede in Bengaluru would have been avoided', RCB management's response to police warning!
Chinnaswamy Stadium Stampede : ३ जून रोजी आरसीबीने १७ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर आरसीबी चाहत्यांचा उत्साह वाढला होता, त्यानंतर त्यांनी देशभर जल्लोष केला. आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. आयपीएलच्या इतिहासात अशी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली आहे. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, अनेकांना वाटत आहे की विजयानंतर अशा आनंदोत्सवाची काही गरज होती का? त्याच वेळी, या घटनेला नेमके कोण जबाबदार आहेत ही जाणून घ्यायचे आहे.
चेंगराचेंगरीला नेमके कोण जबाबदार?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार असे स्पष्ट होते की, बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकार आणि आरसीबी व्यवस्थापन जबाबदार असल्याचे समोर आले आहे. कर्नाटक सरकार आणि आरसीबीचे लोक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यास उत्सुक असल्याची माहिती मिळतआहे. आता उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणाची सखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला असून १० जूनपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाचे निरीक्षण करणाऱ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यवस्थापनाने पोलिसांच्या परवानगीशिवाय बंगळुरूमध्ये विजय परेड होणारा असल्याचे जाहीर केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरुन विजय परेडची माहिती देण्यात आली होती. त्यांची ही पोस्ट अल्पावधीतच १० लाखांहून अधिक वेळा लोकांनी पाहिली गेली. त्यानंतर ४ जून रोजी एम. चिन्नास्वामी यांच्यासमोर प्रचंड गर्दी जमली आणि ही दुर्घटना घडली आणि त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : IPL 2025 : ‘पुढच्या वर्षी चुका सुधारण्याचा प्रयत्न..’, आयपीएल गाजवणाऱ्या Vaibhav Suryavanshi चा मानस..
चेंगराचेंगरीची घटना घडण्यामागील मुख्य कारण म्हणजे आरसीबीने मोफत प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर पोलिसांकडून शक्य तितक्या कमी नोंदणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. त्याच वेळी, पोलिसांनी असेह देखील सांगितले होते की हे उत्सव रविवारीच आयोजित केला पाहिजे. जेणेकरून त्यांना सुरक्षा व्यवस्थेसाठी अधिकचा वेळ मिळणार. दुसरीकडे, राज्य सरकारने पोलिसांनी दिलेल्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले. यामुळेच बंगळुरू पोलिसांना या भव्य कार्यक्रमासाठी जास्त वेळ मिळाला नाही आणि त्यांना गर्दीला नियंत्रित करणे शक्य झाले नाही. या कारणामुळे ही दुर्दैवी घटना घडली.