टीम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : आयपीएलचा थरार संपला असून आरसीबीने पहिल्यांदा आयपीएल टायटल जिंकले आहे. आता टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी भारतीय संघ 20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना २० जूनला खेळवण्यात येणार आहे. या कसोटी स्पर्धेसोबतच भारताची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा देखील सुरू होणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंनी आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत, यावेळी संघ तरुण आणि अनुभवी खेळाडूं अशा मिश्रणासह ब्रिटिश भूमीवर खेळणार आहे. शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसून आले आहेत. यावेळी करुण नायर, साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर यांचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंकडून इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ऋषभ पंत, साई सुदर्शन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज ही दिसून येत आहेत. कुलदीप यादव यांचे नुकतेच लग्न झाले असून तो काही दिवसांनी इंग्लंडला रवाना होणार आहे. कसोटी मालिकेसाठी खेळाडू खूप उत्सुक असल्याचे दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केले आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी कसोटी संघाची घोषणा होण्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केलीय होती. अशा परिस्थितीत, यावेळी या दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे निश्चितच नवख्या संघावर आणि त्यातील खेळाडूंवर दबाव असणार आहे. इंग्लंड संघ निश्चितच या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार असणार आहे.
England-bound & 𝗥𝗘𝗔𝗗𝗬! 👌👌#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/b3KBfHq9I4
— BCCI (@BCCI) June 5, 2025
हेही वाचा : भारतीय संघाला झटका! विराट-रोहितनंतर ‘या’ खेळाडूचा क्रिकेटला राम राम; विश्वविजेत्या संघाचा होता भाग..
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बाथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.