Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinnaswamy Stadium Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकार जबाबदार? उच्च न्यायालयाने विचारले ‘हे’ १० प्रश्न.. 

आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत  ११ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणी कर्नाटक सरकारला उच्च न्यायालयाचे १० प्रश्न विचारले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 07, 2025 | 09:52 PM
Chinnaswamy Stadium Stampede: Is the Karnataka government responsible for the Bengaluru stampede? The High Court asked 'these' 10 questions..

Chinnaswamy Stadium Stampede: Is the Karnataka government responsible for the Bengaluru stampede? The High Court asked 'these' 10 questions..

Follow Us
Close
Follow Us:

Chinnaswamy Stadium Stampede : आरसीबी संघाने १७ वर्षांनंतर पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.  आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत  ११ जणांचा बळी गेला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या दोन अधिकाऱ्यांनीही राजीनामा देखील दिला आहे. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.  ४ जून रोजी झालेल्या आपघाताप्रकरणात सरकारला या प्रश्नांची उत्तरे १० जूनपर्यंत उच्च न्यायालयाला सादर करावी लागणार आहेत.

उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला या १० प्रश्नांची सविस्तर उत्तरे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वतःच्या हस्तक्षेप करत दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी केली. यावेळी  कार्यवाहक मुख्य न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती सी.एम. जोशी यांच्या खंडपीठाने सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा : भारताचा स्फोटक फलंदाज Rinku Singh ची जाणार विकेट! खासदार Priya Saroj सोबत बांधणार लग्नगाठ..

न्यायालयाने सरकारला विचारले १० प्रश्न

  1. विजय परेड आयोजित करण्याचा निर्णय कोणत्या स्तरावर आणि कोणाकडून घेण्यात आला?
  2. या परेडसाठी कोणत्याही प्रकारची आगाऊ परवानगी घेण्यात आली होती का?
  3. ही परेड आयोजित करण्याचा निर्णय कधी आणि कोणत्या प्रक्रियेअंतर्गत घेण्यात आला होता?
  4. या कार्यक्रमाबाबत कोणत्याही प्रकारची मानक कार्यप्रणाली आगाऊ जारी करण्यात आली होती का?
  5. वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली?
  6. परेडच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधांची व्यवस्था काय होती?
  7. गर्दी नियंत्रित करण्यासाठी सरकारने कोणती विशेष व्यवस्था केली?
  8. अपघातानंतर जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यात आली का?
  9. कार्यक्रमात जमणाऱ्या गर्दीबद्दल सरकारने काय अंदाज लावला होता?
  10. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी किती वेळ लागला आणि कोणती प्रक्रिया अवलंबण्यात आली?
हेही वाचा :‘पुजाराला बाद करण्याबाबत व्हायची चर्चा..’, भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार Rohit Sharma ने केला गमतीदार खुलासा..

या कठीण प्रश्नांमुळे आणि न्यायालयीन चौकशीमुळे, राज्य सरकारने बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वरिष्ठ मंत्री, कायदेशीर सल्लागार ए.एस. पोन्नन्ना आणि महाधिवक्ता के.एम. शशिकिरण शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

केएससीएच्या अधिकाऱ्यांचा राजीनामा

राजीनामा देत वेळे अधिकारी म्हणाले की, दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित आणि दुःखद घटनांमध्ये आमची भूमिका खूपच मर्यादित भूमिका असू शकते, परंतु याची आम्ही नैतिक जबाबदारी घेत आमच्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच टे पुढे म्हणाले की,  आम्ही ६ जून २०२५ रोजी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून सचिव आणि कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

Web Title: These 10 questions from the high court to the karnataka government regarding the bengaluru stampede case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 09:52 PM

Topics:  

  • RCB Vs PBKS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.