प्रिय सरोज आणि रिंकू सिंग(फोटो-सोशल मीडिया)
Rinku Singh-Priya Saroj : भारतीय राजकारण आणि क्रिकेट यांचा खूप वेळा संबंध आलेला आपण बघत आलो आहोत. आता पुनः एकदा भारतीय क्रिकेट आणि राजकारण हे एकत्र येताना दिसणार आहेत. सपा खासदार प्रिया सरोज आणि टीम इंडियाची उदयोन्मुख क्रिकेटपटू रिंकू सिंग लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांचा ८ जून रोजी लखनौच्या पंचतारांकित हॉटेल सेंट्रममध्ये रिंग समारंभ होणार आहे. तथापि, या हाय प्रोफाइल समारंभाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे.
या भव्य रिंग समारंभात सहभागी होण्यासाठी सपा प्रमुख अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, राम गोपाल यादव आणि इकरा हसन यासारख्या अनेक राजकीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. रिंकूने त्याच्या काही जवळच्या मित्रांना देखील आमंत्रित केले आहे. तथापि, त्याचा खास मित्र कुलदीप यादव इंग्लंड दौऱ्यामुळे या समारंभात सहभागी होऊ शकणार नाही.
प्रिया सरोज आणि तिचे कुटुंब लखनौला पोहोचले आहे, तर रिंकू सिंगचे कुटुंब कार्यक्रमाच्या एक दिवस आधी शहरात पोहचणार आहे. या समारंभासाठी हॉटेलचा फाल्कन हॉलची सजावट करण्यात येत आहे, जिथे १२×१६ फूट आकाराचा एक भव्य स्टेज तयार करण्यात आला आहे. फक्त पाहुण्यांसाठी सुमारे १५ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. सुरक्षेबाबतही हाय अलर्ट ठेवण्यात आला असून बारकोड स्कॅनिंगद्वारेच प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रिया सरोजच्या लेहेंग्यापासून ते अंगठीपर्यंत सर्व काही या भव्य समारंभासाठी खास असणार आहे. दिल्लीच्या डिझायनर महिमा महाजन यांनी डिझाइन केलेला लेहेंगा आणि कोलकाताहून आणलेली अंगठी या खास दिवसासाठी असणार आहे. तसेच रिंकू सिंग मुंबईच्या डिझायनरचा स्टायलिश कोट-पँट घालणार असून प्रियाला खास अंगठी घालायला लावणार आहे.
हेही वाचा : ‘…आणि तेव्हा वडील खूप निराश होते’; Rohit Sharma ने सांगितली ‘त्या’ खेळीनंतरची घरातील परिस्थिती
खास गोष्ट म्हणजे या समारंभाच्या मेनूमध्ये दोघांच्या निवडीची विशेष काळजी घेतली गेली आहे. प्रियाचा आवडता बंगाली रसगुल्ला आणि काजू पनीर रोल, तर रिंकूचा आवडता पनीर टिक्का आणि मटर मलाई पाहुण्यांना देण्यात येणार आहे.
हे जोडपे १८ नोव्हेंबर २०२५ रोजी वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. जे एका भव्य आणि पारंपारिक पद्धतीने आयोजित केले जाणार आहे. देशभरातील राजकारणी, चित्रपट तारे आणि क्रिकेट सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहे.