फोटो सौजन्य - इंस्टाग्राम/X
पॅरिस ऑलिम्पिक : २७ जुलैपासून भारतीय खेळाडूंचा पॅरिसमधील मोहीम सुरू झाली आहे. भारताच्या संघाला पहिले मेडल मनू भाकर हीने मिळवून दिले. त्यानंतर रिचिता जिंदल आणि अर्जुन बाबूता याने फायनलमध्ये धडक मारली आहे. आज म्हणजेच २९ जुलै रोजी भारताचे अनेक खेळाडू ॲक्शनमध्ये असणार आहेत. आज भारतीय दुपारी १२ पासून खेळताना दिसतील. परंतु या पॅरिसच्या मोहिमेत काही भारतीय ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी फेल झाले आहेत. यामध्ये भारतीय टेबल टेनिसपटू, महिला आर्चरी संघ आणि टेनिसपटू अशा खेळांचा सहभाग आहे.
भारतीय स्टार टेनिसपटू सुमित नागल यांचा पहिला सामना फ्रान्सच्या मुतेतसोबत काल पार पडला. यामध्ये सुमित नागलने दमदार कामगिरी केली. परंतु पुढील फेरीमध्ये जाण्यास तो दोन पॉईंट्सने चुकला. सुमित नागलचा पहिल्या फेरीमध्ये २-६ ६-२ आणि ७-५ असा पराभव स्वीकारावा लागला.
४४ वर्षीय रोहन बोपन्ना आणि श्रीबालाजी यांचा काल फ्रान्स विरुद्ध पॅरिसमधील पहिला सामना पार पडला, या भारतीय सामन्यांमध्ये या जोडीला पराभव स्वीकारावा लागणार आहे. या भारतीय जोडीला ५-७ आणि २-६ अशी हार मिळाली.
भारतीय दिग्गज टेबल टेनिसपटू शरथ कमल यांना त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. असे वाटले होते की, तो हा सामना जिंकेल परंतु प्रतिस्पर्धीने सलग तीन खेळ जिंकून सामना भारतीय यांच्या हातातून हिसकावला.
भारतीय टेबल टेनिसपटू हरमीत देसाई याने त्याचा पहिला सामना सहज जिंकला होता. परंतु दुसरा सामनात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. हरमीतला ८-११ ८-११ ६-११ ८-११ असा पराभवाचा सामना करावा लागला.
भारतीय महिला तिरंदाज संघाने क्वालिफिकेशन चौथे स्थान स्थान गाठून थेट कॉटर फायनल गाठली होती. यामध्ये त्यांचा सामना नेदरलँड झाला आणि या सामनामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आर्चरी संघाला ०५ असा पराभव स्वीकारावा लागला. महिला तिरंदाज संघाच्या खराब कामगिरीमुळे संघाला एलिमिनेशन राउंड असल्यामुळे पॅरिसमधील आर्चरीचे पदक हुकले आहे.