Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UAE vs AFG: झद्रान आणि अटलच्या अर्धशतकामुळे अफगाणिस्तानने युएईचा उडवला धुव्वा

इब्राहिम झद्रान आणि सेदिकुल्लाह अटल यांच्या अर्धशतकांमुळे अफगाणिस्तानने यूएईचा ३८ धावांनी पराभव केला. इब्राहिम झद्रान आणि सेदिकुल्लाह अटल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 02, 2025 | 08:38 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया (Afghanistan Cricket Board)

फोटो सौजन्य - सोशल मिडिया (Afghanistan Cricket Board)

Follow Us
Close
Follow Us:

आशिया कपच्या आधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई या देशांचा जोरदार सराव सुरु आहे. या तीनही देशांमध्ये ट्राय सिरीज खेळवली जात आहे, त्यामुळे सध्या या तीनही देशांची चर्चा सध्या होत आहे. आतापर्यत तीन सामने खेळवले गेले आहेत. इब्राहिम झद्रान आणि सेदिकुल्लाह अटल यांच्या अर्धशतकांमुळे अफगाणिस्तानने यूएईचा ३८ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने २० षटकांत ४ गडी गमावून १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, यूएई संघ निर्धारित षटकांत ८ गडी गमावून केवळ १५० धावाच करू शकला.

टॉस हरून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुहम्मद रोहिद खानने सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. गुरबाजने ११ चेंडूंचा सामना केला आणि ७ धावा केल्या. यानंतर इब्राहिम झद्रान आणि सेदिकुल्लाह अटल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. 

Afghanistan Beat the UAE to Register 1st Tri-Nation Series Victory@IZadran18 (63) and Sediqullah Atal (54) both scored half-centuries, while @rashidkhan_19 (3/21) and @sharafuddinAS (3/24) delivered standout performances with the ball to lead AfghanAtalan to a comprehensive… pic.twitter.com/v3XBv0KZEW — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 1, 2025

सगीर खानने ही भागीदारी मोडली. त्याने अर्धशतक झळकावणाऱ्या अटलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अटलने ४० चेंडूत ५४ धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या दरविश रसूलीला फक्त १० धावा करता आल्या. त्याने ७ चेंडूंचा सामना केला आणि १ चौकार मारला. १८ व्या षटकात इब्राहिम झदरान झेलबाद झाला. झदरानने ४० चेंडूत ६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. 

अजमतुल्ला उमरझाई २० धावा करून नाबाद राहिला आणि करीम जनत २३ धावा करून नाबाद राहिला. मुहम्मद रोहिद खान आणि सगीर खान यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. १८९ धावांचा पाठलाग करताना युएईची सुरुवात फारशी चांगली नव्हती. मुहम्मद जोहैब स्वस्तात बाद झाला. त्याने ७ चेंडूत ७ धावा केल्या. इथन डिसूझाने १२ धावा केल्या. कर्णधार मुहम्मद वसीमने ३७ चेंडूत ६७ धावा केल्या. आसिफ खानने १ धाव केली.

‘ते’ दोन चेंडू आणि इतिहासाला कलाटणी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्वी कधी न घडलेले घडले; वाचा सविस्तर

हर्षित कौशिकने ४, ध्रुव पराशरने १ आणि सगीर खानने आपले खाते उघडले नाही. हैदर अलीने २ धावा केल्या. यष्टीरक्षक राहुल चोप्रा ५२ धावा करून नाबाद राहिला. शराफुद्दीन अश्रफ आणि कर्णधार रशीद खान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. फजल हक फारुकी आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

 

Web Title: Uae vs afg afghanistan thrash uae half centuries from zadran and atal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 08:38 AM

Topics:  

  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

Women’s World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी टीम इंडियात बदल! दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी ‘या’ धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री
1

Women’s World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी टीम इंडियात बदल! दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी ‘या’ धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री

Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर
2

Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर

रणजी ट्राॅफीमध्ये पृथ्वी शाॅने नावावर केला नवा रेकाॅर्ड! अवघ्या 141 चेंडूत ठोकले द्विशतक
3

रणजी ट्राॅफीमध्ये पृथ्वी शाॅने नावावर केला नवा रेकाॅर्ड! अवघ्या 141 चेंडूत ठोकले द्विशतक

शतक झळकावल्यानंतर करुण नायरने निवडकर्त्यांवर साधला निशाणा! टीम इंडियामधून वगळल्याबद्दलचा व्यक्त केला राग
4

शतक झळकावल्यानंतर करुण नायरने निवडकर्त्यांवर साधला निशाणा! टीम इंडियामधून वगळल्याबद्दलचा व्यक्त केला राग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.