कॅनडा वि स्कॉटलंड सामना(फोटो-सोशल मीडिया)
Canada vs Scotland : आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ चे सामने सुरू आहेत. या स्पर्धेतील ८१ वा सामना कॅनडा आणि स्कॉटलंड यांच्यात खेळवला गेला. हा सामना किंग सिटीमधील मेपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंडवर खेळवण्यात आला आहे. जिथे स्कॉटलंडने कॅनडाचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या या सामन्यात आजवर कधी न घडलेली अशी घटना घडली आहे. स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर कॅनडाचा संघ प्रथम फलंदाजी साठी उतरला. यावेळी कॅनडाच्या संघासोबत डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात कधी घडले नाही असे काही घडल्याचे पाहण्यात आले.
हेही वाचा : CPL 2025 मध्ये Tim Seifert चे वादळ घोंघावले! झळकवले सर्वात जलद शतक; केला ‘हा’ पराक्रम
खरं तर, नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर, कॅनडाच्या संघाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन्ही सलामीवीरांना माघारी जावे लागले. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आजतागायत कधीच घडले नव्हते. डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन गेल्याच्या घटना क्रिकेटमध्ये खूप वेळा घडल्या आहेत. परंतु दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन चेंडूवर बाद होण्याची ही पहिलीच घटना आहे. ही घटना ब्रॅड करीच्या पहिल्याच षटकात अनुभवायला मिळाली आहे.
सामना सुरू झाल्यावर सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ब्रॅड करीने कॅनडाचा सलामीवीर अली नदीमला माघारी पाठवले. त्यानंतर परगत सिंग फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याच वेळी दुसरा सलामीवीर युवराज समरा नॉन-स्ट्राइकवर उभा असताना तो सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर धावबाद झाला. त्यामुळे त्यालाही माघारी जावे लागले. त्यामुळे कॅनडाला पहिल्या दोन चेंडूंवर आपले दोन्ही सलामीवीर गमवावे लागले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा :‘दोघांच्या जवळपासही कुणी नाही..’ ‘RO-KO’ च्या निवृत्तीवर फिरकीपटू रवी बिश्नोईची नाजुक साद
या सामन्यात कॅनडाच्या डावावर सुरुवातीपासूनच दबाव असल्याचे जाणवत होते. त्यांचे दोन्ही सलामीवीर हे पहिल्या दोन चेंडूवर बाद झाले. त्यामुळे हा दबाव जास्तच दिसून येऊ लागला होता. स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज ब्रॅड करीने शानदार गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या, ज्यामुळे कॅनडाच्या संघाने ११ षटकांत फक्त १८ धावांत त्यांच्या ५ विकेट्स गमावल्या होत्या. तथापि, श्रेयस मोव्ह्वाने संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न करताना त्याने ६० धावांची खेळी साकारली. ज्यामुळे कॅनडाचा संघ ४८.१ षटकांत १८४ धावांपर्यंत मज मारण्यास यशस्वी झाला. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने सर्वाधिक ४ बळी घेतले. दुसरीकडे, स्कॉटलंडने हे लक्ष्य ४१.५ षटकांत ३ गडी गमावून सहज गाठले आणि विजय मिळवला.