Umpires now have the upper hand on the cricket field! ICC issues 'this' rule to combat slow over rate..
Slow over rate rule from ICC : स्लो ओव्हर रेटच्या समस्येचा सामना करण्यासाठी आयसीसीकडून कसोटी क्रिकेटमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. आता आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये ‘स्टॉप क्लॉक’ नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यह नियम या आता सुरू झालेल्या २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नवीन चक्रापासून लागू केला जाणार आहे. ज्याची सुरुवात श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात गॉल येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेपासून करण्यात आली आहे.
आयसीसीच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या कसोटी खेळण्याच्या अटींनुसार, आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्रत्येक षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत पुढचे षटक सुरू करण्यासाठी तयार राहावे लागणार आहे. मैदानावर एक इलेक्ट्रॉनिक घड्याळ असेल, जे ० ते ६० सेकंदांपर्यंतचा वेळ दाखवेल. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वेळेवर षटक टाकणे सुरू केले नाही, तर पहिले दोन इशारेदेण्यात येतील. तिसऱ्या चुकीसाठी, फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड दिला जाणार आहे. तथापि, ८० षटके पूर्ण झाल्यानंतर हे इशारे रद्द मानण्यात येतील.
हेही वाचा : टीम इंडियाच्या चॅम्पियन कोचची पुन्हा होणार एंट्री? खराब कामगिरीमुळे गौतम गंभीरचा पत्ता कट होणार?
तसेच नवीन नियमांनुसार, जर एखाद्या फलंदाजाने जाणूनबुजून शॉर्ट रन घेतला तर पुढील चेंडूवर कोणता फलंदाज स्ट्राईकवर असेल हे ठरवण्याचा अधिकार क्षेत्ररक्षक संघाला असणार आहे. यासोबतच, फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड देखील ठोठावण्यात येईल.
आयसीसीकडून असे देखील स्पष्ट करण्यात आले की, आता जर चेंडूवर लाळ लागली तर पंचांना चेंडू बदलण्याची आवश्यकता असणार नाही. लाळेवरील बंदी अजून देखील लागू आहे, परंतु आता चेंडू प्रत्यक्षात खेळण्यायोग्य नसतानाच बदलला जाणार आहे. अहवालानुसार, काही क्षेत्ररक्षक संघ जाणूनबुजून चेंडूवर लाळ लावून चेंडू बदलण्याचा प्रयत्न करत असत, परंतु आता पंचांना त्याचे निरीक्षण करावे लागणार आहे.
हेही वाचा : Photo : ‘या’ भारतीय फलंदाजांकडून एजबॅस्टनमध्ये शतकांची बरसात, तरीही टिम इंडियाच्या पदरी निराशा..
आयसीसीने डीआरएसबबातही स्पष्ट केले आहे की, जर खेळाडू आणि मैदानावरील पंच दोघांनीही एकाच वेळी डीआरएससाठी अपील केले तर अपील ज्या क्रमाने करण्यात आले आहे. त्याच त्या क्रमाने निर्णय घेतला जाणार आहे.