फोटो सौजन्य – X
India vs England Match Update : मागील दोन वर्षांमध्ये भारताच्या संघाने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताचा माजी कोच राहुल द्रविड याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने t20 विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये देखील फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये राहुल द्रविड हा एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून त्याचे नाव घेतले जाते.
राहुल द्रविड यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. राहुल द्रविड याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारतीय नियमाक मंडळाने गौतम गंभीर याला प्रशिक्षण पद दिले. नेतृत्वाखाली भारताच्या संघाने 2025 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले, पण त्याआधी झालेल्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाला फारच निराशजनक पराभव स्वीकारावा लागला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये भारताच्या संघाला घरच्या मैदानावर वाईट वाॅश करण्यात आले होते. तर बॉर्डर गावास्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या संघाला फक्त एक सामना जिंकता आला होता. या दोन्ही कसोटींच्या पराभवानंतर भारताच्या संघाजवळ ते चॅम्पियनशिप फायनलमधून नाव कट झाले होते. सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच जणांची कसोटी मालिका सुरू आहे. यामध्ये भारताची संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये इतिहास देखील चांगला राहिलेला नाही त्यामुळे भारत या मालिकेमध्ये तरी चांगली कामगिरी करण्याची इराद्यात असेल.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
🚨 RAHUL DRAVID 2.0 IN RED BALL 🚨
Rahul Dravid may replace Gautam Gambhir as head coach for Indian Test cricket. pic.twitter.com/h1vWkiaDXW
— indianTeamCric (@Teamindiacrick) June 25, 2025
अजूनही या मालिकेची चार कसोटी सामने सुरू आहे त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. मीडियाच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की आता रेड बॉल क्रिकेटमधून गौतम गंभीर याला काढून पुन्हा एकदा राहुल द्रविड याला संघामध्ये स्थान दिले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अजून पर्यंत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारताच्या संघासाठी सुरु असलेली मालिका ही फार महत्वाची आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या मालिकेवर असणार आहेत.