
Do you know the strangest shots in the world of cricket? The names of 'these' players became 'this' trademark shot; Read in detail
हेही वाचा : Bangladesh vs Ireland: लिटन दासचा शतकी तडाखा! रचले तीन विक्रम; दिग्गजांच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री
या यादीमध्ये भारतीय टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवचा समावेश आहे. सूर्याचा स्वीप शॉट हा मंत्रमुग्ध करणारा आहे. तो ‘सुपला’ शॉट आणि ‘अपरकट’ सारख्या अपारंपरिक आणि अनोख्या शॉट्ससाठी क्रिकेट जगात ओळखला जातो.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला देखील आपल्या अनोख्या शॉटसाठी क्रिकेट जगतात ओळखला जातो. तो मैदानावर विविध प्रकारचे गुंतागुंतीचे शॉट्स खेळत असताना दिसून येतो. २०२३ च्या विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या ‘नो फूटवर्क’ शॉटने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
पाकिस्तानी युवा सलामीवीर सॅम अयुब त्याच्या असामान्य शॉट्ससाठी क्रिकेट जगात प्रसिध्द्धीस पावला आहे. त्याचा ‘नो लूक शॉट’ पाहण्यासारखा असतो. लेग साईडकडे शॉट मारताना तो ज्या पद्धतीने चेंडूपासून दूर पाहतो ते क्रिकेट चाहत्यांना चकित करणारे असेच असते. त्याने या शॉटचा वापर करून ९४ मीटरचा षटकार खेचला होता.