
UP vs GT, WPL Live Score: UP Warriorz start with a toss win; invite Gujarat Giants to bat.
UP Warriors and Gujarat Giants face off! महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील दूसरा सामना आज शनिवारी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात यूपी वॉरियर्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजारत जायंट्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसणार आहेत. मेग लॅनिंग युपीचे नेतृत्व करणार आहे तर गुजारत जायंट्सची धुरा ऍशलेह गार्डनरकडे असणार आहे.
अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाज मेग लॅनिंग आपल्या संघाला या हंगामाची सुरुवात विजयाने करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. लॅनिंगकडे यंदा युपी संघाची धुरा देण्यात आली आहे. यापूर्वी लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली होती. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा वॉरियर्सला होण्याची अपेक्षा वक्त करण्यात येत आहे. फलंदाजीमध्ये फोबे लिचफिल्ड आणि किरण नवगिरे सलामीला स्थिरता देण्याची क्षमता ठेवतात. तर मधल्या फळीत लॅनिंग आणि हरलीन देओल यांच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा असणार आहे.
तसेच गुजरात जायंट्सची कर्णधार एशले गार्डनरच्या नेतृत्वाखाली संघाबाबत बोलायच झालं तर परदेशी खेळाडूंचा मजबूत गाभा आहे. बेथ मूनी विकेटमागे आणि वरच्या फळीत महत्त्वाची भूमिका बाजवण्याची क्षमता आहे. तर सोफी डिवाइन डब्ल्यूपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. रेणुका सिंग ठाकूरच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजी आणि गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, राजेश्वरी गायकवाड यांसारख्या फिरकीपटूंचे पर्याय जायंट्सला संतुलित बनवतात. दोन्ही संघ बदलाच्या टप्प्यातून जात असल्याने, महिला प्रीमियर लीग २०२६ हंगामातील हा पहिला सामना त्यांच्या संपूर्ण मोहिमेची दिशा ठरवणारा ठरू शकतो.
यूपी वॉरियर्स : डिआन्ड्रा डॉटिन, मेग लॅनिंग (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, किरण नवगिरे, श्वेता सेहरावत (विकेटकीपर), आशा शोभना, सोफी एक्लेस्टोन, शिखा पांडे, क्रांती गौड
गुजरात जायंट्स : सोफी डिव्हाईन, बेथ मुनी (यष्टीरक्षक),ऍशलेह गार्डनर (कर्णधार), अनुष्का शर्मा, कनिका आहुजा, भारती फुलमाळी,काशवी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, जॉर्जिया वेरहॅम, रेणुका सिंह ठाकूर