मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धा
वेदांश, रावी, शौर्य अन् इराचा दणका! पीएमडीटीए ब्राँझ सिरीज Tennis स्पर्धेत पटकावले विजेतेपद…
५५ वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या चौथ्या मानांकित मनीष रावत याने पुण्याच्या सहाव्या मानांकित विवेक फडणीस याचा ८-११, ११-३, ११-३, ११-२ असा पराभव करत विजेतेपद मिळवले. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर मनीषने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत पुढील तीन गेममध्ये वर्चस्व राखले.५५ वर्षांवरील महिला गटाच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या शिल्पा जोशी हिने मुंबई शहरच्या अनघा जोशी हिच्यावर पाच गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत ३-११, ११-८, ११-१३, ११-९, ११-६ असा विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. चुरशीच्या या सामन्यात शिल्पाने निर्णायक पाचव्या गेममध्ये प्रभावी खेळ करत बाजी मारली.
स्पर्धेच्या ४० वर्षांवरील पुरुष सांघिक गटात योद्धाज ‘अ’ संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संतोष वक्राडकर आणि दीपक कदम यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर योद्धाज ‘अ’ संघाने योद्धाज ‘ब’ संघाचा ३-१ असा पराभव केला. वैयक्तिक तसेच सांघिक गटातील रंगतदार लढतींमुळे या स्पर्धेला चांगलीच रंगत आली. अनुभवी खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.






