

वैभव सूर्यवंशीचा युएईच्या गोलंदाजांना दणका
सुरुवातीलाच भारताला दोन धक्के
युएईचा डाव हरप्रीतने सावरला
IND A vs UAE : भारतानं रायझिंग स्टार्स आशिया चषक सामन्यात युएईने दिलेल्या 250 धावांचा पाठलाग अवघ्या 15 व्या षटकात 3 बाद 253 धावा करत केल्या. या सामन्याचा हिरो ठरला आक्रमक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ज्याने आधी 28 चेंडूंत शतक झळकावत एक नवा विक्रम रचला, तोच काही मिनिटांत त्याने 53 चेंडूंत खणखणीत द्विशतक ठोकत नवा विक्रम आपल्या नावे केला. त्याने या सामन्यात तब्बल 28 षटकार ठोकले.
नेपाळ व नंतर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध सपशेल फेल ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने आल्यापासून युएईच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. त्याने जलदगती गोलंदाज असो वा फिरकीपटू कोणालाही सोडले नाही. बॅट खाली आलेला अथवा फुलटॉस चेंडू सीमारेषेपार धाडला.
त्याने तर अनेक वेळा चेंडू ग्राउंडच्या बाहेर धाडला, ज्यामुळे सामना काही सेकंदांसाठी थांबवण्यात आला होता. पाचव्या षटकातच त्याने भारताची धावसंख्या 100 पार नेली. तर काही वेळातच त्याने 28 चेंडूंत शतक ठोकले. त्यानंतर हाकेच्या अंतरावर दिडशे धावा, तर 53 चेंडूंत खणखणीत द्विशतक.
भारताला विजयासाठी 5 धावांची गरज असताना तो बशील अहमदच्या गोलंदाजीवर अयांश शर्माकरवी झेलबाद झाला. तोपर्यंत त्याने 53 चेंडूंत 7 चौकार आणि 28 षटकारांच्या मदतीने, तसेच 384.91 च्या सरासरीने 204 धावा रचल्या होत्या. हा ODI मधील आतापर्यंतचा एक नवा विक्रमच म्हणावा लागेल.
या सामन्यात एका बाजूने जरी वैभव युएईच्या गोलंदाजांचा समाचार घेत असला तरी युएईच्या गोलंदाजांनी पहिल्या फळीतील दोन फलंदाज झटपट बाद केले होते. ज्यात अभिषेक शर्मा (12) आणि आयुष बदोनीच्या जागी या सामन्यात संधी मिळालेल्या प्रभसिमरन सिंग (3) यांचा समावेश होता.
दरम्यान, या दोन विकेटचा वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीवर काही परिणाम जाणवला नाही. त्याने आपल्या शैलीनुसार फलंदाजी केली व युएईच्या गोलंदाजांचे वाभाडे काढले.