Varun Chakaravarthy : वरुण चक्रवर्तीचा आणखी एक विक्रम, निम्मे खेळाडू तंबूत पाठवत, रचला आणखी एक विक्रम
Vijay Hazare Trophy 2024-25 : विजय हजारे ट्रॉफीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करीत पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. राजस्थान 5 विकेट घेत सर्व डाव फक्त २६७ धावांवर रोखला. एकेकाळी राजस्थान संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करीत होता पण चक्रवर्तीच्या गूढ फिरकीसमोर संघ चांगलाच अडचणीत आला. वरुण चक्रवर्तीने एकट्याने राजस्थान संघाचा अर्धा भाग एकट्याने तंबूत पाठवला. या उजव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाने फक्त ५२ धावा देऊन ५ बळी घेतले. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीने, वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा दावा केला आहे.
वरुणचे ‘चक्रवर्ती’ प्रदर्शन
वरुण चक्रवर्तीने हरियाणाच्या अभिजीत तोमर, महिपाल लोमरोर, दीपक हुड्डा यांना बाद करीत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याशिवाय त्याने अजय सिंगची विकेटही घेतली. खलील अहमदची विकेट घेऊन त्याने आपले पाच विकेट पूर्ण केल्या. हरियाणा संघाचा कर्णधार महिपाल लोमरोर आणि सलामीवीर अभिजीत तोमर यांनी एकदा शतकी भागीदारी केली होती पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीने ही भागीदारी मोडली. यानंतर, त्याने दीपक हुड्डाला ७ धावांवर बाद केले आणि शतकवीर अभिजीत तोमरलाही वरुण चक्रवर्तीने बाद केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावा
वरुण चक्रवर्तीसाठी पाच विकेट्स खूप महत्त्वाच्या ठरू शकतात कारण असे वृत्त आहे की या खेळाडूची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड होऊ शकते. ११ जानेवारी रोजी भारतीय संघ निवड समिती आणि गंभीर-रोहित यांच्यात एक बैठक होणार आहे ज्यामध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय, टी-२० मालिकेसाठी तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची निवड केली जाऊ शकते. यामध्ये वरुण चक्रवर्तीची निवड होऊ शकते. कुलदीप यादव अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. वरुण चक्रवर्तीचा फॉर्मही उत्कृष्ट आहे, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या आहेत. आता निवडकर्ते त्याच्यावर बाजी मारतात की नाही हे पाहणे बाकी आहे.
वरुण चक्रवर्तीची कारकीर्द
वरुण चक्रवर्तीने टीम इंडियासाठी १३ टी-२० सामन्यांमध्ये १९ विकेट्स घेतल्या आहेत पण त्याने अद्याप एकदिवसीय पदार्पण केलेले नाही. हा उजव्या हाताचा गूढ फिरकी गोलंदाज या फॉरमॅटमध्येही चमत्कार करू शकतो. चक्रवर्तीने आतापर्यंत २३ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५९ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने चार सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत. वरुणच्या या कामगिरीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा दावा मजबूत होत असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा : ‘कॅप्टन कूल’ इज बॅक? Champions Trophy 2025 साठी धोनी मेंटोर असणार? पहा अंदर की बात…