महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा मेंटोर असणार? (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ९ मार्चपर्यंत चालणार आहे. भारतीय संघाचे सामने यूएईमध्ये, तर इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. दरम्यान चॅम्पियन ट्रॉफीसाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय चॅम्पियन ट्रॉफीसाठी मेंटोर म्हणून भारताच्या सर्वात यशवी कर्णधाराची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. म्हणजेच बेस्ट फिनिशर, माजी कर्णधार एमएस धोनी चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा मेंटोर असण्याची शक्यता आहे.
सध्या गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वात भारताला गेल्या काही सामन्यांमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी सामन्यात किंवा नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणजेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया स्पर्धेत भारताला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे कदाचित बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापन चॅम्पियन ट्रॉफीसाठी धोनीचा विचार करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित गाऊं गंभीरच्या मदतीसाठी देखील धोनीला या स्पर्धेत भारतीय संघाचा मेंटोर केले जाऊ शकते.
🚨 MS DHONI BACK 🚨
– MS Dhoni is set to mentor Team India for the 2025 Champions Trophy! 🏆
– Can Captain Cool's magic bring another ICC trophy home.🔥 pic.twitter.com/y2DS2Y9baX
— Jonnhs.🧢 (@CricLazyJonhs) January 8, 2025
महेंद्र सिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. भारतीय क्रिकेट संघाने नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 , 2011 विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केला आहे.
चॅम्पियन ट्रॉफी ही महत्वाची स्पर्धा असल्याने महेंद्र सिंह धोनीला भारतीय संघाचा मेंटोर म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे वेळापत्रक आणि भारतीय संघाचे वेळापत्रक कसे असणार त्याबद्दल जाणून घेऊयात. भारतीय संघाचे सामने हे दुबईतमध्ये खेळवले जाणार आहेत.
Champions Trophy India Schedule
20 फेब्रुवारी – भारत विरुद्ध बांगलादेश
23 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान
२ मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार सामने
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपले सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे. टीम इंडिया 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार आहे आणि टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना 2 मार्चला न्यूझीलंडशी होणार आहे.
भारत दोन वेळा चॅम्पियन बनला
2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा विजय ऐतिहासिक होता, जेव्हा त्याने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला आणि रोमांचक विजय नोंदवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील हा विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सदैव अमर राहील. पण त्याआधी सुमारे 11 वर्षे 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती. वास्तविक, त्यावेळी मुसळधार पावसामुळे सामना होऊ शकला नाही, त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.