सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची पुनर्भेट
मुंबईत सचिन तेंडुलकरने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरण समारंभात त्याचा मित्र विनोद कांबळी यांची पुन्हा भेट घेतली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेंडुलकर आणि कांबळी हे आचरेकरांचे शिष्य होते, ज्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या क्रिकेटची सुरूवात केली आणि दोघांनीही क्रिकेट विश्वात नाव कमावले.
दोन्ही क्रिकेटपटू किशोरवयापासूनच उत्कृष्ट फलंदाजी करायचे, याचे संपूर्ण श्रेय प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना जाते. शालेय क्रिकेटमध्ये या दोघांनी 664 धावांची मोठी भागीदारी केली होती ज्यामुळे दोघांनाही क्रिकेट जगतात पहिली ओळख मिळाली होती. कांबळी आणि तेंडुलकर हे रमाकांत आचरेकर यांचे दोन महान शिष्य म्हणून ओळखले जातात. सचिन जगातील महान क्रिकेटपटू बनला असला, तरी प्रतिभा असूनही कांबळीला त्याच्या चुकांमुळे कारकीर्दीत चढउतार पाहावे लागले. मात्र आता ही जोडी पुन्हा एकत्र दिसली आणि यावेळी आपल्या जीवलग मित्राला पाहून विनोद कांबळी भावूक झाल्याचे दिसून आले, या घटनेचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होतोय (फोटो सौजन्य – X.com)
कुठे झाली ही भेट?
आता हे दोघेही प्रशिक्षकाच्या स्मारकाच्या अनावरण समारंभात एकत्र दिसले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सचिन स्वत: कांबळीकडे गेला आणि त्याचा हात धरला. सचिन त्याच्याकडे आल्याचे कांबळीलाही आश्चर्य वाटल्याचे या व्हिडिओत दिसून येते.
हा व्हिडिओ पाहून चाहते भावूक झाले असून सचिनच्या हावभावाने कांबळीही भावूक झाला आहे. सचिन आणि कांबळीच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहेत. इतकेच नाही तर या कार्यक्रमात कांबळीने आपल्या प्रशिक्षकाच्या आठवणीत एक गाणेही गायले, ज्यावर सचिनने टाळ्याही वाजवल्या.
IPL च्या इतिहासातील सर्वात महाग विकले जाणारे अनकॅप खेळाडू; सर्व विक्रम निघाले मोडीत
पाहा सचिन-विनोदच्या भेटीचा व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: Former Indian Cricketer Sachin Tendulkar met former cricketer Vinod Kambli during an event in Mumbai.
(Source: Shivaji Park Gymkhana/ANI) pic.twitter.com/JiyBk5HMTB
— ANI (@ANI) December 3, 2024
विनोद कांबळी सध्या आजारी
अलीकडच्या काळात कांबळीची प्रकृती ठीक नसल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच, आणखी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो स्वत: चालू शकत नाही, ज्यामुळे त्याचे चाहते त्याच्या तब्येतीची काळजी करू लागले होते. कांबळीने 2022 मधील त्याच्या चिंताजनक आर्थिक परिस्थितीबद्दल देखील सांगितले आणि उघड केले की तो पूर्णपणे BCCI ने दिलेल्या पेन्शनवर अवलंबून आहे ज्यातून तो आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे.
कांबळीची कारकीर्द
कांबळीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, या डावखुऱ्या फलंदाजाने 17 कसोटीत 1084 धावा केल्या होत्या ज्यात 4 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता, तर कांबळीने भारतासाठी 104 एकदिवसीय सामने खेळले होते आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 2477 धावा करण्यात यशस्वी ठरला होता 2 शतके आणि 14 अर्धशतके करण्यात यशस्वी. दरम्यान कांबळी आणि सचिनचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरी आता अशी अपेक्षा करत आहेत की मास्टर ब्लास्टर त्याच्या मित्राला मदत करेल आणि त्याच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पुन्हा जागृत करेल.