फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी झालेल्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला विकत घेतले नाही. मुंबईने इशानला कायम ठेवलं नाही. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच इशान किशनबाबत मौन सोडले आहे. SRH ने इशानला मोठ्या रकमेवर आपल्या संघात सामील केले आहे.
गेल्या 7 वर्षांपासून संघासोबत असलेल्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता
IPL 2025 मेगा लिलावाची पहिली रिटेन्शन लिस्ट आली तेव्हा मुंबई इंडियन्सने गेल्या 7 वर्षांपासून संघासोबत असलेल्या त्यांच्या एका खेळाडूला सोडले. हा दुसरा तिसरा कोणी नसून यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आहे. इशान किशनचा मुंबई इंडियन्ससोबतचा सात वर्षांचा कालावधी संपला आहे. इशान किशन आता IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे. मुंबईने इशान किशनला रिटेन केले नाही तेव्हा मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझी त्याला खरेदी करेल असे वाटत होते.
काय म्हणाला हार्दिक पांड्या
💌 𝓉ℴ 𝐼𝓈𝒽𝒶𝓃 #MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ishankishan51 pic.twitter.com/K1Gz5DKYUU
— Mumbai Indians (@mipaltan) December 1, 2024
अनेकदा असे घडते की, फ्रँचायझी आपल्या जुन्या खेळाडूला कायम ठेवू शकली नाही, तर तो त्याच्यासाठी लिलावात जातो, परंतु मुंबई कॅम्पने इशान किशनबाबत आधीच योजना आखली होती. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने आता याबाबत मौन तोडले असून मुंबई इंडियन्सने इशान किशनला लिलावात का विकत घेतले नाही हे सांगितले. कारण हार्दिक पांड्याच्या मैत्रीबाबत असे बोलले जात होते की, तो कोणत्याही परिस्थितीत इशान किशनला संघात ठेवू इच्छितो.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि इशान किशन हे मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. हार्दिकलाही ईशान खूप आवडतो. त्यामुळेच IPL 2025 साठी मुंबईत न परतल्याने ईशान खूप निराश झाला होता. मुंबई इंडियन्सने इशान किशनच्या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये हार्दिकने आपली बाजू मांडली.
ईशान एक दमदार खेळाडू
हार्दिक म्हणाला, ईशान एक दमदार खेळाडू आहे. जेव्हा आम्ही त्याला कायम ठेवू शकलो नाही, तेव्हा आम्हाला माहित होते की त्याला लिलावात परत विकत घेणे खूप कठीण जाईल. यामुळेच लिलावात इशानसाठी संघाची फारला इंट्रेस दिसून आला नाही. आम्हाला ईशान किशनची खूप आठवण येईल. इशान किशन, तू नेहमी MIचा पॉकेट-डायनॅमो राहशील. आम्हा सर्वांना तुझी आठवण येईल आणि आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करत राहू.
मुंबईला ईशानवर पैसे खर्च करायचे नव्हते
इशान किशनचे नाव जेव्हा लिलावात आले तेव्हा मुंबई इंडियन्सने त्याच्यावर बोली लावली नाही असे नाही. मुंबई 3.20 कोटींपर्यंत गेली पण इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी हात वर केले. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात ईशानसाठी चुरशीची स्पर्धा झाली, पण शेवटी सनरायझर्सने बाजी मारली.