
Vladimir Putin: Vladimir Putin is fascinated by 'this' game! He showered gifts worth more than 1.5 billion rupees on the player.
Vladimir Putin loves bear fighting games : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मागील एका वर्षात हा त्यांचा पहिलाच दौरा असून पंतप्रधान मोदी पुतीन यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः पालम विमानतळावर पोहोचले होते. सध्या पुतिन यांच्या भारत भेटीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे, कारण ही दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांना खेळांमध्ये जास्त रुचि आहे. ते ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. ते आइस हॉकी, फुटबॉल आणि घोडेस्वारीमध्ये देखील तज्ज्ञ आहेत. ते रशियन फायटर खाबिब नुरमागोमेदोव्ह यांचे मोठे चाहते असून ज्यांना पुतीन यांनी कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत.
२०१८ मध्ये UFC २२९ नंतर, संपूर्ण जगाला माहिती झाले की, कोनोर मॅकग्रेगर आणि खाबिब नुरमागोमेदोव्ह यांच्यातील लढाई रिंगमधून बाहेर पडून रस्त्यावर आली होती. तेव्हा या वादामुळे, नेवाडा अॅथलेटिक कमिशनकडून खाबीबवर ५००,००० अमेरिकन डॉलर्स (त्या वेळी अंदाजे ४ कोटी रुपये) चा मोठा दंड ठोठावण्यात आला होता. खाबीबच्या एकूण लढाईच्या पैशाचा मोठा भाग त्याने गमावला होता. तथापि, असा दावा करण्यात येतो की, या विजयानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी खाबीब नुरमागोमेदोव्ह यांना लाखो रुपयांच्या हेत वस्तू दिल्या होत्या.
या मोठ्या विजयानंतर काही दिवसांमध्येच, खाबीब आणि त्यांचे वडील अब्दुलमानाप नुरमागोमेदोव्ह रशियातमध्ये आले आणि त्यांना राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याकडून लाखो रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या असल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. वृत्तांनुसार, पुतिन यांनी खाबीब आणि त्यांच्या वडिलांना रशियामध्ये सुमारे २० दशलक्ष (आजच्या किमतीत अंदाजे १६०-१७० कोटी रुपये) किमतीची जमीन आणि आलिशान घरे भेट म्हणून दिली असल्याची माहिती आहे.
UFC 229 मध्ये आयरिश फायटरविरुद्ध खाबीब नुरमागोमेडोव्हची लढाई मथळे बनली. 6 ऑक्टोबर 2018 रोजी, लास वेगासमध्ये 2.4 दशलक्षाहून अधिक पे-पर-व्ह्यू चाहत्यांसमोर, खाबीबने चौथ्या फेरीत कोनोर मॅकग्रेगरला सादर करण्यास भाग पाडले. कोनोर मॅकग्रेगर वारंवार खाबीब आणि MMA समुदायाच्या इतर सदस्यांना ऑनलाइन टोमणे मारताना दिसत असतो. ऑक्टोबर 2020 मध्ये खाबीबने UFC मधून निवृत्ती जरी घेतली असली तरी, ही लढत आज देखील चर्चेचा विषय ठरत असते.
हेही वाचा : हा तर रोनाल्डोच खेळताना दिसतोय! एका बिहारी मुलाचा फुटबॉल मैदानावर जादुई खेळ; Video पाहाल तर थक्क व्हाल
खाबीब नुरमागोमेडोव्हचे अस्वलाशी कुस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. हे त्याच्या प्रशिक्षणाचा भाग असून तो लहानपणापासूनच हे करत आला आहे.